लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना शेतकºयांसह सेतू संचालक आणि अधिकाºयांना अग्निपरीक्षा देणारी ठरली आहे. अनेक शेतकºयांचे आधारकार्डच 'अपडेट' नसल्याने नवीन कर्जमाफीचा अर्जच स्वीकृत होत नसल्याचा प्रकार पुढे आला आहे. धारणी व अचलपूर उपविभागाच्या चार तालुक्यांत १७ हजार अर्ज भरण्यात आले असून सात दिवसांत २८ हजार अर्ज भरण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.राज्य शासनाने गोर-गरीब शेतकºयांसाठी दीड लक्ष रुपयांपर्यंत केलेली कर्जमाफी आणि त्यासाठी लादलेले नियम संताप व्यक्त करणारे ठरले आहे. दिवस निघताच तालुकयाच्या ठिकाणी अर्ज भरण्याची पायपीट करावी लागत असून अनेकांना रोजंदारीची कामे सोडून यावे लागत असल्याचे चित्र आहे.आधार कार्ड नुतनीकरणाचा अडसरआधार कार्ड काढल्यानंतर त्याचे तीन वर्षांनंतर नूतनीकरण करणे गरजेचे असून तसे न केल्यास आधार कार्ड बंद करण्यात आल्याचा फटका शेकडो शेतकºयांना बसत आहे. मंगळवारी सावळी बु. येथील वासुदेव कच्चराजी नांदणे या ७५ वर्षीय शेतकºयाचा अर्ज भरण्यात आला. त्यानंतर त्यांच्या पत्नीचे आधार कार्ड अपडेट नूतनीकरण नसल्याने तीन दिवसांपासून सुरू असलेली त्यांची पायपीट व्यर्थ ठरली. आधार कार्ड अपडेट नसल्याचा अर्थ सदर व्यक्ती हा मृत झाला असे होतो. परिणामी शेकडो शेतकºयांचे अर्ज तूर्तास बाद होत असल्याने किमान १० ते १२ दिवसांनंतर आधारचे 'अपडेट' झाल्यांनंतर त्यांना अर्ज भरावा लागणार आहे. दुसरीकडे १५ सप्टेंबर शेवटची तारीख असताना शेकडो शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित राहणार असल्याचे सत्य आहे.आधार कार्ड मोबाईलवर अपडेट केल्यास दोन दिवसांत नूतनीकरण होते. त्यासाठी शेतकºयांनी मोबाईलचा वापर करावा, उर्वरित शेतकºयांचे अर्ज भरण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे.- निर्भय जैन,तहसीलदार, अचलपूर
आधारने केले जिवंत व्यक्तींना मृत घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2017 11:20 PM
छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना शेतकºयांसह सेतू संचालक आणि अधिकाºयांना अग्निपरीक्षा देणारी ठरली आहे.
ठळक मुद्देकर्जमाफीची डोकेदुखी : अचलपूर, धारणी, चांदूरबाजार, चिखलदºयात २८ हजार अर्ज बाकी