स्थानिक वॉर्ड १ चे नगरसेवक मुन्ना तिवारी आणि नलिनी रक्षे प्रतिनिधित्व करीत आहेत. दलितवस्ती सुधारणा योजना-२०२१ अंतर्गत मंजूर कामे होत नसल्याबाबत नागरिकांनी दोहोंकडे रोष व्यक्त केला. हे दोन्ही नगरसेवक हेतुपुरस्पर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला. या कामांऐवजी दुसरीच कामे होत असल्याबाबत नगरसेवकांना नगरपालिकेत गुरुवारी घेराव करण्या. आला. त्यावर तुम्हाला पाणी दिले म्हणून जिवंत आहात, असे त्यांनी नागरिकांना सुनावले. यामुळे नागरिक संतप्त झाले. अखेर मुख्याधिकारी आणि नगरपालिका कर्मचारी यांची समिती नेमून बैठक घेऊन अतिमहत्त्वाची कामे करण्याचे आश्वासन देण्यात आले. घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्या. आले. आंदोलनात सहभागी वंचित बहुजन आघाडीचे सुशील बेले, सूरज कासुर्दे, ताहीर खान, रवि घोडीले यांना पोलिसांनी अटक केली.
आंदोलनात वॉर्ड १ मधील सतीश मेश्राम, रोशन सोने, राजू बसले, दारा ठाकरे, बाबूराव ठाकरे, शेख जमीर, गणपत धुर्वे, नीलेश ब्राम्हणे, कुणाल बेसरे, सत्तार खान, गफ्फार खान, रोशन उघडे, शेख समीर, शेख जाकीर, सनाउला खान, गुड्डू बिहारी, सागर ब्राम्हणे, अशफाक काजी, अब्दुल जाकीर आदी नागरिक उपस्थित होते.