शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

तीन दिवसांत सर्वेक्षण, महिनाभरात नुकसान भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 11:01 PM

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्ह्यातील आठ तालुक्यांत ११ फेब्रुवारी रोजी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या बाधित क्षेत्राचे तीन दिवसांच्या आत सर्वेक्षण करून संयुक्त स्वाक्षरी अहवाल जिल्हा प्रशासनास आठवड्याच्या आत सादर करा, असे आदेश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सोमवारी बैठकीत दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत ...

ठळक मुद्देप्रवीण पोटे-पाटील यांचे आदेश

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्ह्यातील आठ तालुक्यांत ११ फेब्रुवारी रोजी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या बाधित क्षेत्राचे तीन दिवसांच्या आत सर्वेक्षण करून संयुक्त स्वाक्षरी अहवाल जिल्हा प्रशासनास आठवड्याच्या आत सादर करा, असे आदेश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सोमवारी बैठकीत दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान यांच्यासह गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार, लीड बँक मॅनेजर, पोकराचे समन्वयक आदी उपस्थित होते.जिल्ह्यात मोर्शी, वरूड, चांदूर बाजार, अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, चिखलदरा व धारणी या आठ तालुक्यांत गारपिटीसह पाऊस पडला आहे. या अवकाळी पावसाने हरभरा, गहू, केळी, संत्रापिकांचे प्रचंड नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एकूण ३८४ गावातील सुमारे ३१ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. कृषी, महसूल विभागाने तातडीने नुकसानग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण व पंचनामे करून संयुक्त स्वाक्षरी अहवाल तीन दिवसांचे आत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा, अहवाल करीत असताना बाधित शेतकºयांना अधिकाधिक नुकसान भरपाई मिळायला हवी, या दृष्टीने अहवाल करावा, असे निर्देश पालकमंत्री पोटे यांनी अधिकाऱ्यांना दिले.कृषी संजीवनी योजनेंतर्गत ५३२ गावांची निवडजागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा (पोकरा) आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. या प्रकल्पाविषयी शेतकºयांना माहिती होण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेऊन जनजागृती करावी. या प्रकल्पांतर्गत समूह तसेच वैयक्तिक प्रकल्पांसाठी शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी अनुक्रमे ७५ टक्के व ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ५३२ गावांची निवड करण्यात आली असून सुमारे ५८ क्लस्टर हे खारपाणपट्ट्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. उपरोक्त सर्व गावांत पाच टप्प्यांत कामे पूर्णत्वास जाणार आहे. शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी शेतकºयांना सहकार्य करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यासाठी भरीव निधी मिळणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.दलितवस्ती सुधारणा योजनेंतर्गत ३० कोटींचा निधी मंजूरसन २०१७-१८ या वर्षाकरिता सुमारे ३० कोटी निधी दलित वस्ती सुधारणा अंतर्गत मंजूर झाला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती यांना निधीचे वितरण करण्यात आले आहे. प्राप्त झालेल्या निधीतून प्रत्येक नगरपरिषद, नगरपंचयातींनी रस्ता व नाला बांधणीच्या कामांना प्राधान्य द्यावे. कुठलेही काम करताना ते गुणवत्तापूर्ण व पारदर्शकपणे होईल याची दक्षता घ्यावी. विकासकामात प्रत्येक पदाधिकाºयांना सहभागी करून घ्यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी सोमवारच्या आढावा बैठकीत दिले.तालुकानिहाय नुकसानमोर्शी तालुक्यात ४० गावांमध्ये २,५०४ हेक्टर, वरूड तालुक्यात ६ गावांमध्ये ५० हेक्टर, चांदूरबाजार तालुक्यात १५४ गावांमध्ये १७,१०३ हेक्टर, अचलपूर तालुक्यात ५७ गावांत ६,३७५ हेक्टर, दर्यापूर तालुक्यात १७ गावांत ४३ हेक्टर, अंजनगाव सुर्जी तालुक्यात ४,५२५ हेक्टर, चिखलदरा तालुक्यात ६ गावांमध्ये १६ हेक्टर, तर धारणी तालुक्यात २० गावांमधील ११० हेक्टरमध्ये नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला सादर झाला आहे.