लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात जीवघेणा स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले असतानाही अद्याप जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वॅब किट उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासनाला जनतेची काळजी आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.शहरातील स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह रुग्णावर नागपूर येथे उपचार सुरू आहे, तर दोन संशयित रुग्णांवर अमरावतीत उपचार होत आहेत. खासगी रुग्णालयांतून शासकीय यंत्रणेला संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्यासाठी बोलाविले जाते. मात्र, किटच उपलब्ध नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. टॅमी फ्लू गोळ्या रुग्णांना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना पुरविल्या जात असल्या तरी रुग्णांचा स्वॅब घेतला जात नसल्यामुळे स्वाइन फ्लूचे निश्चित निदान होणार तरी कसे, असा प्रश्न निर्माण होत आहे. किट उपलब्ध करून देण्यासंदर्भात इर्विन प्रशासनाने आरोग्य विभागाकडे प्रस्ताव पाठविला. शंभर किट उपलब्ध करून देण्याचा तो प्रस्ताव आहे. मात्र, अद्याप किट उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे ही बाब संशयित रुग्णांच्या जिवावर बेतणारी ठरण्याची शक्यता वाढली आहे.स्वाईन फ्लूची लक्षणेथंडी, १०० फॅरनहॅटपेक्षा जास्त ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब व कधी कधी पोटदुखी आदी विविध लक्षणांचा समावेश स्वाइन फ्लूमध्ये असतो.दक्षता कशी घ्यावी?असे लोक जे खूप आजारी आहेत व ज्यांना स्वाइन फ्लू असण्याची शक्यता आहेत, अशांना प्रतिबंधक औषधे दिली जाऊ शकतात. त्यातून काही प्रमाणात बचाव होऊ शकतो. अशी औषधे ७० ते ९० टक्के प्रभावी ठरतात. पण, या औषधांचा वापर डॉक्टर व त्या व्यक्तीच्या आजाराच्या स्वरूपावर अवलंबून असतो.असा होतो प्रसारनव्या स्वाइन फ्लू विषाणू तीव्र संसर्ग पसरवतात. याचा प्रसार माणसापासून माणसाला होतो. स्वाइन फ्लू विषाणू बाधित व्यक्तीच्या खोकण्याने किंवा शिंकण्याने हवेत उडणाऱ्या तुषारातील विषाणू धूलिकणावेष्टित स्वरूपात जिवंत राहतात. श्वसन करताना नाकातून किंवा तोंडावाटे याचा संसर्ग होऊ शकतो तसेच अशा बाधित व्यक्तींच्या नाकावाटे किंवा तोंडावाटे बाहेर निघणारा कफ हातावर लागल्यानंतर ती व्यक्ती जिथे जिथे स्पर्श करेल, तिथे तिथे संसर्ग होऊ शकतो.स्वाइन फ्लूचे रुग्ण अद्याप रुग्णालयात दाखल झाले नाहीत. पीडिएमसीतून स्वॅबसाठी एक कॉल होता. स्वॅब किट उपलब्ध नसल्यामुळे किटची मागणी वरिष्ठ स्तरावर केली आहे. स्थानिक स्तरावरून किट खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.- श्यामसुंदर निकम जिल्हा शल्यचिकित्सकअमरावती
जीवघेण्या स्वाईन फ्लूची किटच उपलब्ध नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 10:59 PM
जिल्ह्यात जीवघेणा स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले असतानाही अद्याप जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वॅब किट उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासनाला जनतेची काळजी आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ठळक मुद्देशहरात एक पॉझिटिव्ह, दोन संशयित : आरोग्य यंत्रणेला नागरिकांची काळजी आहे तरी कुठे?