शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पक्षिमित्रांनी वाचविले १५ जंगली कबुतरांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 11:07 PM

तालुक्यातील उत्तमसरा गावात शिकाऱ्याकडून १५ जंगली कबुतरांना पक्षिमित्रांनी सोडविले. तपासणीनंतर ते वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले.

ठळक मुद्देअंधश्रद्धेचे ठरतात बळी : वनविभाग आणि वसा संस्थेची संयुक्त कार्यवाही, उत्तमसरा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कभातकुली : तालुक्यातील उत्तमसरा गावात शिकाऱ्याकडून १५ जंगली कबुतरांना पक्षिमित्रांनी सोडविले. तपासणीनंतर ते वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले.उत्तमसरा गावात मंगळवारी सकाळी ६ च्या सुमारास चार शिकारी शिरले. गावानजीक असलेल्या शेतात त्यांनी शिकारी जाळे लावले. जाळ्यावर टाकलेल्या धान्याकडे कबुतरे आकर्षित होऊन त्यात अडकली. सकाळपासून पाळतीवर असलेल्या ग्रामस्थांनी वसा संस्थेला या घटनेची माहिती दिली. संस्थेचे सहायक पशुचिकित्सक शुभम सायंके, पक्षिमित्र भूषण सायंके, निखिल फुटाणे, मुकेश मालवे, पंकज मालवे आणि गणेश अकर्ते यांनी शेतात जाऊन पडताळणी केली असता, त्यांना चार शिकारी आढळले व जखमी अवस्थेत १५ कबुतरेही मिळाली. वसाच्या माहितीवरून उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुम्बर यांच्या मार्गदर्शनाखाली शिकार प्रतिबंध पथकाचे वनरक्षक अमोल गावणेर, उमक आणि ठाकूर यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परंतु, शिकारी पसार झाले होते. जखमी कबुतरांवर शुभम सायंके यांनी प्रथमपोचार केलेत. तपासणीनंतर सर्व कबुतरे वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकारावर वनविभागाने अंकुश ठेवण्याची मागणी पक्षिमित्रांनी केली आहे.लकव्याच्या उपचारासाठी शिकारलकवा गेलेल्या रुग्णाला जंगली कबुतराचे रक्त लावल्यास तो बरा होतो, या गैरसमजातून दररोज अनेक जंगली कबुतरांची शिकार केली जाते. अशी शिकारीची घटना आढळल्यास वनविभागाच्या १९२६ या निशुल्क क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती वसाचे शुभम सायंके यांनी दिली.शिकारीची क्रूर पद्धतशिकारी त्यांची पाळीव कबुतरे जाळ्यात बांधून ठेवतात. त्यांना उपाशी ठेवून अवतीभोवती धान्य टाकतात. बाजूला धान्य असूनही ते खाता येत नसल्याने ती कबुतरे जिवाच्या आकांताने ओरडतात. त्यांचे ओरडणे ऐकून परिसरातील इतर कबुतरे जाळ्यानजीक येऊन अडकतात. लपून बसलेला शिकारी हातामधली दोरी ओढतो. पक्षी जाळ्यात अडकल्यानंतर त्यांचे एका बाजूचे पंख हाताने उपटून मोडून टाकतात. त्यामुळे हे पक्षी उडू शकत नाही, असे निखिल फुटाणे यांनी सांगितले.