शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
3
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
4
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
5
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
6
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
7
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
8
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
9
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
10
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
11
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

एएसआयसह शिपाई निलंबित

By admin | Published: November 07, 2016 12:09 AM

मध्यवर्ती बसस्थानकासमोरील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत वाहतूक शाखेतील एएसआयसह शिपायाला निलंबित करण्यात आले आहे.

छायाचित्र बोलले : बसस्थानक चौकातील वाहतूक कोंडीअमरावती : मध्यवर्ती बसस्थानकासमोरील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत वाहतूक शाखेतील एएसआयसह शिपायाला निलंबित करण्यात आले आहे. ‘वाहतूक नियोजन आहे तरी कुठे?’ अशा शीर्षकाखाली ‘लोकमत’ने ५ नोव्हेंबरच्या अंकात बसस्थानक चौकातील वाहतूक कोंडीचे बोलके छायाचित्र प्रकाशित केले होते. या छायाचित्राच्या आधारे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी शनिवारी उशिरा रात्री बसस्थानक चौकात शुक्रवारी कार्यरत दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश काढलेत. सहायक पोलीस उपनिरीक्षक उमेश राठोड व पोलीस शिपाई सतीश महल्ले अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ते ४ नोव्हेंबरला सकाळी ६ ते ११ आणि दुपारी ४ ते १० वाजेपर्यंत वाहतूक नियंत्रणासाठी बसस्थानक परिसरात तैनात होते. ४ नोव्हेंबरला बसस्थानाकसमोर एसटी, आॅटोरिक्षा व अन्य खासगी वाहनांंसह फेरीवाल्यांची विचित्र कोंडी निर्माण झाली होती. कुठले वाहन कुठून येतेय आणि कुठे चाललेय, हेच कळत नव्हते. नेमका तोप्रसंग ‘लोकमत’च्या छायाचित्रकाराने टिपला त्याअनुषंगाने या स्थितीसाठी जबाबदार धरून उपरोक्त कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले (प्रतिनिधी)पोलिसांची प्रतिमा डागळण्यास कारणीभूतमासिक गुन्हे परिषद आणि अन्य बैठकीच्यावेळी सर्व संबंधित वाहतूक पोलीस अधिकारी/ कर्मचाऱ्यांना शहरातील वाहतूक नियमनासाठी लेखी व तोंडी सूचना दिल्यात. मात्र, तरीही आपण आदेश आणि सूचनांकडे दुर्लक्ष करून कर्तव्यात निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा करून कसूर केला. ‘लोकमत’मधील प्रकाशित छायाचित्रामुळे जनमानसात पोलिसांची प्रतिमा डागाळण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका महल्ले व राठोड यांच्यावर आयुक्तांनी ठेवला आहे.