आयुक्तांचा निर्णय : पूर्वसूचना न देता गैरहजर राहणे भोवलेअमरावती: महापालिकेचे पशुशल्य चिकित्सक सुधीर गांवडे यांना बुधवारी निलंबित करण्यात आले आहे. कर्तव्य व्यवस्थित न बजावल्याच्या कारणास्तव आयुक्त अरुण डोंगरे यांनी ही कार्यवाही केली असून गावंडे हे गट ‘अ’ मध्ये वर्ग १ चे अधिकारीपदी कार्यरत आहेत.पशुशल्य विभागामार्फत मोकाट जनावरांचा बंदोबस्त, अत्याधुनिक कत्तलखान्याचा विषय, पशू संंवर्धन संबंधित धोरण, कोंडवाड्याची देखभाल, मांस विक्रीवर नियंत्रण आदी विषय हाताळले जातात. मात्र, या विभागाचे प्रमुख सुधीर गावंडे हे मागील काही महिन्यांपासून वरिष्ठांनी वेळोवळी दिलेल्या निर्देशानुसार सुचनांचे पालन करीत नसल्याचे निर्दशसनास आले आहे. मोकाट जनावरांचा सुळसुळाट ही नित्याचीच बाब झाली असताना जिवीत हानीची शक्यता बळावली होती. हा सर्व प्रकार आयुक्तांनी गावंडे यांना वारंवार अवगत देखील केला आहे. अत्याधुनिक कत्तलखाना संदर्भात न्यायालयात काही कागदपत्रांचा पाठपुरावा करण्याचे आदेशीत करण्यात आले होते. मात्र, गावंडे यांच्या दुर्लक्षाने ते पूर्ण करता आले नाही. एवढेच नव्हे तर ३० मार्च रोजी पार पडलेल्या अर्थसंकल्पीय सभेला पशुशल्य विभागातील कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते. ही बाब प्रशासकीय कामकाजाला न शोभणारी ठरली. अंदाजपत्रकाच्या सभेला गैरहजर राहायचे असेल तर प्रशासनाला कळवावे लागते. परंतु गावंडे यांनी तशी कोणतीही पूर्व सूचना न देता गैरहजर राहिलेत. गावंडे यांना अनुपस्थितीबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहेत. कोणतीही सूचना न देता रजेवर जाणे व सतत राजीनाम्याची धमकी देवून प्रशासनास वेठीस धरणे या सर्व कृत्यामुळे पशुशल्य विभागातील कामकाजात अडथळा निर्माण झाला आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची, कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरवित महाराष्ट्र नागरी सेवा ( वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम (१) (२) (३) चा भंग करणारी असल्यामुळे सुधीर गावंडे यांनी कर्तव्यात कसूर केला आहे. गावंडे यांना महापालिका अधिनियमाचे कलम ५६ (२) (एफ) नुसार सेवेतून तात्काळ निलंबित केले आहे.
महापालिकेतील पशुशल्यचिकित्सक निलंबित
By admin | Published: April 02, 2015 12:30 AM