शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?
2
विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी
3
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाविकास आघाडीत जागावाटपात घोळ? सोलापूरात एकाच जागेवर ठाकरेंचा अन् काँग्रेसचा उमेदवार
4
हैदराबादमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, ८ वाहने जळून खाक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
6
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
7
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
8
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
12
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

केरोसीनच्या अनुदान प्रक्रियेला स्थगिती

By admin | Published: April 06, 2016 12:02 AM

आधार कार्ड लिंक करून १ एप्रिल २०१६ पासून तालुक्यातील रेशनकार्डधारकांना मिळणारे केरोसीनचे अनुदान त्यांच्या बँकखात्यात जमा करण्यात येणार होते.

पूर्वीच्याच पद्धतीने वाटप :२२ हजार ग्राहक लाभापासून वंचितचांदूरबाजार : आधार कार्ड लिंक करून १ एप्रिल २०१६ पासून तालुक्यातील रेशनकार्डधारकांना मिळणारे केरोसीनचे अनुदान त्यांच्या बँकखात्यात जमा करण्यात येणार होते. परंतु नियोजित कालावधीत आधारकार्ड, बँकखाते व एलपीजी गॅस धारकांच्या माहितीचे संकलन न होऊ शकल्याने तालुक्यातील केरोसिनचे अनुदान सरळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या प्रक्रियेला सहा महिन्यांसाठी स्थगिती देण्यात आली आहे.केरोसीन अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा करण्यासाठी महसूल विभागाकडून पहिल्या टप्प्याच्या पाहणीनुसार तालुक्यात ३१ मार्च २०१६ पर्यंत कार्डधारकांची संख्या ४५ हजार ६७९ इतकी आहे. याची केरोसीन वितरणासाठी महसूूल विभागाने ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र अशी विभागणी केली आहे. ग्रामीणमध्ये ४२ हजार ७५ तर नगरपालिका क्षेत्रात ३ हजार ६०४ रेशनकार्डधारकांचा समावेश आहे. यासर्व कार्डधारकांची पुुन्हा वर्गवारी करण्यात आली असूून ग्रामीण क्षेत्रात एपीएल ११ हजार तर नगरपालिका क्षेत्रात एपीएल प्राधान्यगट ९०८, शेतकरी एपीएल ९६९, बीपील १ हजार १४०, शुभ्र २१३, अंत्योदय ३७४ अशी वर्गवारी महसूल विभागाकडून करण्यात आली आहे. शासनाच्या नवीन केरोसीन वितरण धोरणानुसार, केरोसीनच्या विगतवारीनिहाय केरोसीनची मागणी तालुक्यासाठी करण्यात आली आहे. ही मागणी करताना तालुक्यातील २२ हजार ७५ एलपीजी गॅसधारकांना केरोसीन वाटपामधून वगळण्यात आले आहे. यात एक व दोन गॅस सिलिंडरधारकांचा समावेश आहे. यात ग्रामीण क्षेत्रातील १९ हजार ८१३ तर नगरपालिकाक्षेत्रातील २ हजार २६२ गॅसधारकांचा समावेश आहे. परिणामी आजच्या घटकेला तरी तालुक्याच्या केरोसीन मागणीत २९ हजार १२६ लिटरने केरोसीनच्या मागणीत घट झाली आहे. याआधी तालुक्याला १ लाख १६ हजार ३२८ किलो लिटर केरोसीन महिन्याकाठी प्राप्त होत होते. याचे वाटप तालुक्यात सहा ठोक व १०२ चिल्लर विक्रेत्यांमार्फत केले जात होते. एप्रिल महिन्याकाठी महसूल विभागाकडून केरोसीनच्या विगतवारी नुसार नवीन धोरणाप्रमाणे गॅसधारक वगळून ८७ हजार २०२ किलो लिटर केरोसीनची मागणी करण्यात आली आहे. हे केरोसीन प्राप्त होताच उपरोक्त वितरण व्यवस्थेव्दारे ग्रामीण व शहरी भागातील कार्डधारकांपर्यंत तो पोहोचविण्यात येणार आहे. केरोसीनवाटप शहरी व ग्रामीण क्षेत्रासाठी सारखेच राहाणार आहे. १ व्यक्ती २ लिटर, २ व्यक्ती ३ लिटर, ३ व्यक्ती ४ लिटर असे केरोसीन कार्डवर्गवारीनुसार कार्डधारकांना मिळणार आहे.शासनाने दिलेल्या कालावधीत कार्डधारकांची आधारकार्ड व बँक माहिती व गॅस कनेक्शन माहिती गोळा होऊ शकली नाही. त्यामुळे खात्यात अनुदान जमा करण्याच्या प्रक्रियेला सहा महिन्यांसाठी तालुक्याला स्थगिती देण्यात आली आहे. नवीन धोरणानुसार केरोसीन वाटप होणार असून केरोसीनच्या मागणीत संपूर्ण आकडेवारी जुळल्यानंतर बदल होऊ शकतो.- रुपाली सोळंके, तालुका पुुरवठा निरीक्षक, चांदूरबाजार