शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

अहमदाबादहून परत आणलेल्या युवकाचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 10:46 PM

किचकट व अवजड कामे करीत असलेल्या मेळघाटातील १० अल्पवयीन मजुरांना अहमदाबाद येथून परत आणण्यात ‘की पर्सन’ ठरलेल्या २२ वर्षीय युवकाचा शुक्रवारी मृत्यू झाल्याचे उघड झाले. तो १ जानेवारीपासून बेपत्ता होता. त्याच्या मृत्यूने बोथरा गावात शोककळा पसरली आहे.

ठळक मुद्देबोथरा गावात शोककळा : १ डिसेंबरपासून बेपत्ता, शुक्रवारी आढळला मृतदेह

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : किचकट व अवजड कामे करीत असलेल्या मेळघाटातील १० अल्पवयीन मजुरांना अहमदाबाद येथून परत आणण्यात ‘की पर्सन’ ठरलेल्या २२ वर्षीय युवकाचा शुक्रवारी मृत्यू झाल्याचे उघड झाले. तो १ जानेवारीपासून बेपत्ता होता. त्याच्या मृत्यूने बोथरा गावात शोककळा पसरली आहे.खुशियाल रामलाल जावरकर (२२, रा. बोथरा) असे मृताचे नाव आहे. धारणी तालुक्यातील बोथरा येथील १० मुलांकडून सुलभ काम व जादा पगाराच्या आमिंषातून अवजड कामे करून घेतली जात होती. अहमदाबाद येथे त्याच्यासह काम करीत असलेल्या या मुलांच्या सुटकेसाठी धारणी पोलिसांनी ‘आॅपरेशन मुस्कान राबविले. २७ डिसेंबरला या मुलांना बोथरा येथे परत आणले होते. या संपूर्ण मोहिमेत खुशियाल हा महत्त्वाचा दुवा होता. त्याने स्वत:कडील मोबाइलद्वारे या मुलांबाबत राइज फाउंडेशनचे ऋषीकेश खिलारे यांना माहिती कळविली. त्यांच्या माध्यमातून धारणी पोलिसांना सूचना देण्यात आल्या.२७ डिसेंबरला ही मुले आई-वडिलांकडे परत आली. परंतु, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच ‘आॅपरेशन मुस्कान’चा मुख्य दुवा असलेला खुशियाल बेपत्ता झाला होता. गावकऱ्यांकडून त्याचा शोध घेतला जात असताना, शुक्रवारी सायंकाळी गावातील जंगलामध्ये गुराखी श्रावण कालू धुर्वे यांनी खुशियालचे मृतदेह पाण्याच्या डबक्यात पाहिला. जमादार प्रमोद बाळापुरे आणि शिपाई राजेश अहिर यांनी त्याचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय आणला. शनिवारी सकाळी डॉक्टर दिनकर पाटील यांनी पोस्टमार्टम केल्यानंतर खुशियालचा मृतदेह त्यांच्या पालकांचे स्वाधीन केला.वडील रामलाल जावरकर यांचेकडे एक एकर कोरडवाहू जमीन असून, त्यातून कोणतेही उत्पन्न होत नसताना आपला खांदा पुरुष अचानक पणे सोडून गेल्यामुळे रामलालच्या कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे.मजूर कंत्राटदाराकडून घातपात?खुशियाल हा आॅपरेशन मुस्कानचा ‘की पर्सन’ होता. त्याने लपविलेल्या मोबाइलमुळे अहमदाबाद येथील रंग कंपनीमधून १० मुलांची सुटका करता आली. याप्रकरणी मजूर ठेकेदाराकडून घातपाताची शंका सामाजिक कार्यकर्ते ऋषीकेश खिल्लारे यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.आॅपरेशन मुस्कान मोहिमेंतर्गत बोथा गावातील या १० मजुरांना गुजरातमधून परत आणण्यात आले, त्यात खुशियालचा समावेश होता. त्याच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.- विलास कुळकर्णी,पोलीस निरीक्षक, धारणी