शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
3
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
5
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
6
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
7
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
8
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
9
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
10
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
11
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
12
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
13
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
14
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
15
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
16
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
17
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
18
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
19
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
20
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

शेतकऱ्यांच्या हाती शस्त्र देऊन शिवरायांकडून स्वराज्य क्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 10:56 PM

प्राप्त परिस्थितीला वश न जाता, शेतीचे व मातीचे रक्षण करण्याची प्रेरणा शिवरायांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांना दिली, असे प्रतिपादन शिवव्याख्याते नितीन बानुगुडे यांनी केले.

ठळक मुद्देशिवशाही महोत्सव : नितीन बानुगुडे यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्राप्त परिस्थितीला वश न जाता, शेतीचे व मातीचे रक्षण करण्याची प्रेरणा शिवरायांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांना दिली, असे प्रतिपादन शिवव्याख्याते नितीन बानुगुडे यांनी केले.अमरावती महानगरपालिका, रुक्मिणी सामाजिक विकास बहुउद्देशीय मंडळ व शिव सह्याद्री प्रतिष्ठानद्वारे संत ज्ञानेश्वर संस्कृतिक भवनात आयोजित शिवशाही महोत्सव २०१८ चा समारोपीय सोहळ्यात शुक्रवारी नितीन बानुगुडे यांचे शिवव्याख्यान झाले. परकीयांच्या आक्रमणाने व घोड्यांच्या टापांंनी शेतकºयांची उभी पिके नष्ट केलेली असायची. तेव्हा शेतकरी शिवाजी महाराजांकडे धाव घ्यायचे. महाराज त्यांना म्हणाले, जेव्हा तुमच्या रानात मोत्यासारख्या कणसांचे पाखरं नुकसान करतात, तेव्हा तुम्ही काय करता? आम्ही बांधावर गोफण्या घेऊन उभे राहतो जी, असे उत्तर मिळाले. शिवराय म्हणाले, आताही तेच करा. हा मंत्र घेऊन दगडांच्या माºयाने शेतकºयांनी शत्रूंना पळवून लावले. जे लष्करालाही जमले नाही, ते शिवाजी महाराजांनी शेतकºयांचा हातात शस्त्र देवून जगातील पहिली क्रांती केली. त्याचे नाव होते ‘स्वराज्य’ तीच खºया अर्थाने शेतकºयांची क्रांती होती, असे प्रतिपादन बानुगुडे यांनी केले.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार बच्चू कडू, जिजाऊ बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे, नगरसेवक विलास इंगोले, दिनेश बूब, महापालिका विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेश वानखडे, भाजपचे प्रणय कुलकर्णी, बाजार समिती उपसभापती नाना नागमोते, सुधीर सूर्यवंशी, किशोर चांगोले, उमेश अर्डक, मनोज भोजणे, धनंजय बंड, विनोद कोरडे, गजानन देशमुख, स्वराज बंड उपस्थित होते. प्रास्ताविक भूषण फरतोडे व संचालन श्रीकृष्ण पखाले यांनी केले.वसा फांऊडेशनच्या पदाधिकाºयांचे, रॉबीन हुड आर्मी संस्था, अव्दैत बहुउद्देशीय संस्थेसह महिला टीमचेसुद्धा शिवशाही महोत्सवात गौरव करण्यात आला. यावेळी माजी आमदार संजय बंड यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या स्मृत्यर्थ शिवशाही महोत्सव पुढील वर्षापासून आयोजित होईल.‘नाळ’ टीमचा गौरव‘नाळ’ या मराठी चित्रपटातील अमरावतीच्या बालकलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. श्रीनिवास पोखळे, मैथाली ठाकरे, संकेत इटनकर यांनी ‘नाळ’मधील डायलॉग सादर करून श्रोत्यांना खिळविले. यावेळी कास्टिंग डायरेक्टर प्रवीण इंदू यांचाही गौरव करण्यात आला.