बोरगाव धांदे येथील विजया सुधीर बंगाले (५२) यांच्याशी आरोपी सलील सच्चिदानंद काळे (३२, रा. लुणावत नगर धामणगाव रेल्वे) याने जवळीक साधून अनेक महत्त्वाची कागदपत्रे स्वतःच्या ताब्यात ठेवली होती. यादरम्यान सलीलने त्यांच्या बँकेखात्यात स्वत:चे नाव जोडले व त्यांचे खोटे मृत्युपत्र बनून ठेवले होते. फसवणुकीची जाणीव होताच विजया बंगाले यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये लाखोंची हडप केलेली रक्कम व दस्तावेज परत करण्याची मागणी केली होती. २४ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी दत्तापूर पोलिसांनी सलील काळे व शिल्पा कात्रे (३४, रा. अंजनगाव सुर्जी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. जिल्हा सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना तात्पुरता जामीन मंजूर केला होता. ३० जूननंतर एसडीपीओ कार्यालयातून से पाठवण्यात आला होता. त्यावर १२ जुलै रोजी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी वकील सुनील देशमुख, ॲड.अनिल विश्वकर्मा व ॲड अनिरुद्ध लढढा यांच्या युक्तिवादानंतर तात्पुरता असलेला जमीन नामंजूर करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव करीत आहेत.
त्या ठगबाज दोन आरोपींचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:16 AM