शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; मात्र सोलापुरात देवेंद्र फडणवीसांची एकही सभा नाही!
2
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
3
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
4
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
5
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
6
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
7
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
8
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
9
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
10
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
11
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
12
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
13
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
14
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
17
आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू; शिंदेंचा मविआवर घणाघात  
18
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
19
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
20
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."

स्वाईनची दहशत कायम, डेंग्यूला अर्धविराम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 11:33 PM

महापालिका क्षेत्रात मागील आठवड्यात स्वाईन फ्लूने दोघांचा मृत्यू झाल्यामुळे संसर्गाचा धोका कायम आहे. प्रभावी उपाययोजनांमुळे तूर्तास डेंग्यूला अर्धविराम मिळाला आहे.

ठळक मुद्देप्रभावी उपाययोजनाची गरज : लोकसहभागाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका क्षेत्रात मागील आठवड्यात स्वाईन फ्लूने दोघांचा मृत्यू झाल्यामुळे संसर्गाचा धोका कायम आहे. प्रभावी उपाययोजनांमुळे तूर्तास डेंग्यूला अर्धविराम मिळाला आहे. १५ व १७ सप्टेंबरला केवल कॉलनी व बडनेºयाच्या माळीपुºयातील दोन वृद्ध महिलांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याने बळींची संख्या ११ वर पोहोचली आहे.२९ मार्च ते २५ सप्टेंबर या कालावधीत १४८ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. पैकी १२७ अहवाल प्राप्त झाले असून त्यातील ३८ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ९३ अहवाल स्वाईन निगेटिव्ह असून २१ स्वॅबचे अहवाल अद्याप अप्राप्त आहेत. स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आढळलेल्या गगलानीनगर येथील ५१ वर्षीय पुरुषाचा अकोला येथे १३ एप्रिलला, तर त्यापूर्वी विलासनगर येथील एका ४० वर्षीय महिलेचा इर्विनमध्ये ३० मार्चला मृत्यू झाला. त्यानंतर ६ एप्रिल, १० एप्रिल, १७ एप्रिल व २९ एप्रिलला अनुक्रमे कपीलवस्तूनगर, फ्रेजरपुरा, रोशननगर आणि रुबानगर येथील २३ ते ६५ वर्षे वयोगटातील दोन महिला व दोन पुरूषांचा मृत्यू स्वाईन फ्लूने झाला. त्यानंतर खोलापुरीगेट येथील एका ३० वर्षीय महिलेचा खासगी रुग्णालयात ५ मे रोजी मृत्यू झाला.तत्पश्चात १ मे रोजी वृंदावन कॉलनी येथील ४८ वर्षीय इसमाचा बोंडे हॉस्पिटलमध्ये, तर रहाटगाव येथील ४५ वर्षीय महिलेचा नागपूर येथे स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. चार महिने स्वाईन आटोक्यात आला, असे निरीक्षण नोंदविले जात असताना १५ सप्टेंबरला केवल कॉलनी येथील ६५ वर्षीय महिलेचा व १७ सप्टेंबरला माळीपुरा बडनेरा येथील ६४ वर्षीय स्त्रीचा पुन्हा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला.२१ संशयितस्वाईन फ्लू संशयित २१ जणांचे स्वॅब १९ ते २५ सप्टेंबरदरम्यान तपासणीस पाठविण्यात आले. त्यांचा अहवाल अद्याप अप्राप्त आहेत. स्वाईन फ्लूच्या संशयितांमध्ये विलासनगर, मोतीनगर, दस्तुरनगर, अंबागेट, उत्तमनगर, दत्तविहार कॉलनी, मोतीनगर, समता कॉलनी, सौरभ कॉलनी, मेहेरदीप कॉलनी, राहुलनगर, मराठा कॉलनी, जुनीवस्ती, जयसियाराम नगर, शेगाव नाका, शामनगर, अंबाविहार, मोची गल्ली येथील रूग्णांचा समावेश आहे.डेंग्यूचे सात पॉझिटिव्हजानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत डेंग्यू संशयित ८६ रुग्णांचे रक्तजल नमुने यवतमाळला तपासणीसाठी पाठविण्यात आले. सप्टेंबरमध्ये पाठविलेल्या ६६ पैकी ७ रक्तजल नमुने दूषित (पॉझिटिव्ह) आढळून आलेत. प्रभावी उपाययोजनांमुळे डेंग्यू आटोक्यात आला आहे. ४, ५, ६, ७ व १९ सप्टेंबरला पाठविलेले ७ रक्तजलनमुने पॉझिटिव्ह आढळून आले होते.