वर्धा नदीच्या कोरड्या पात्रात प्रतीकात्मक जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 01:40 AM2019-05-15T01:40:50+5:302019-05-15T01:41:23+5:30

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने वर्धा नदीच्या कोरड्या पात्रात मंगळवारी प्रतीकात्मक जलसमाधी आंदोलन केले. संपूर्ण तालुका कोरड्या दुष्काळात होरपळला असताना, भाजपक्षाने पाण्यासाठी राजकारण चालविले असल्याचा आरोप करण्यात आला.

Symbolic waterway in the dry area of the Wardha river | वर्धा नदीच्या कोरड्या पात्रात प्रतीकात्मक जलसमाधी

वर्धा नदीच्या कोरड्या पात्रात प्रतीकात्मक जलसमाधी

Next
ठळक मुद्देकाँग्रेस-राष्ट्रवादीचे आंदोलन : अप्पर वर्धाचे पाणी सोडण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने वर्धा नदीच्या कोरड्या पात्रात मंगळवारी प्रतीकात्मक जलसमाधी आंदोलन केले. संपूर्ण तालुका कोरड्या दुष्काळात होरपळला असताना, भाजपक्षाने पाण्यासाठी राजकारण चालविले असल्याचा आरोप करण्यात आला. मोर्शीचे आमदार अनिल बोंडे यांचा निषेध करून अप्पर वर्धा नदीचे पाणी तालुक्यात सोडण्याची आग्रही मागणी करण्यात आली.
अप्पर वर्धा धरणाचे पाणी वर्धा नदीपात्रात सोडून ते तिवसा तालुक्याला देण्याची मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी केली होती. मात्र त्यात राजकारण शिरल्याने सोमवारी अवघ्या दोन तासांत धरणाचे दरवाजे बंद करून पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी तालुक्यातील खडका फाटा स्थित वर्धा नदीच्या कोरड्या पात्रात काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक जलसमाधी आंदोलन केले. वर्धा नदीला पाणी सोडण्यात यावे, अन्यथा हजारो नागरिक या नदीत सामूहिक आत्महत्या करतील, असा इशारा नगराध्यक्ष वैभव वानखडे यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप राऊत, शहराध्यक्ष भूषण यावले, दिलीप भुयार, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष रीतेश पांडव, बबलू मक्रमपुरे, नरेंद्र विघ्ने, अतुल देशमुख, दिवाकर भुरभुरे, किसन मुंदाने, कुंदन कंळबे, विजय करडे, सचिन राऊत, सचिन अढाऊ, उमेश राऊत आदी यावेळी उपस्थित होते.

 

 

Web Title: Symbolic waterway in the dry area of the Wardha river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.