अमरावती : महापालिकेद्वारा सातत्याने सुरू असलेल्या अतिक्रमण मोहिमेचा प्रतीकात्मक पध्दतीने महापालिकेच्या आवारात वरली-मटकाचा व्यवसाय सुरू करून निषेध नोंदविण्यात आला. मुन्ना राठोड व सहकारी तसेच हॉकर्स यांनी आंदोलन करून महापौर, आयुक्त यांचे लक्ष वेधले. कुठलेच नियोजन नसताना महाापालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई सुरू आहे. हॉकर्स झोन अजूनही अस्तित्वात नाही. शहरातील कित्येक मार्केटमध्ये पार्किंगची सुविधा उपलब्ध न करता त्या जागेमध्ये व्यवसाय करीत आहे. शहरातील पार्किंगच्या जागेवर व्यापारी प्रतिष्ठाने उभारली गेली आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस प्रशासन दाखवित नाही. मात्र, कर्ज काढून हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यावर मात्र, कारवाई केली जात आहे. या कारवाईला विरोध नाही मात्र, हॉकर्स झोन नाहीत, आहे ते चुकीचे आहेत. त्यामुळे महापालिकेने ही कारवाई थांबवावी. याविषयीचे नियोजन करून विशेष आमसभा बोलवावी व जप्त केलेले साहित्य त्वरित परत देण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली. यावेळी गजेंद्र तिडके, सागर देशमुख, समीर जवंजाळ यांच्यासह हॅाकर्स उपस्थित होते.
हॉकर्सद्वारा प्रतीकात्मक वरली-मटक्याचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 4:29 AM