अमरावती : येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयातील मुलांच्या वस्तीगृहामधून टॅब, लॅपटॉप व मोबाईल असा ६८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबविण्यात आला. ही घटना २८ मे रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी रविवारी दुपारी अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, पीडीएमसीतील बॉईज होस्टेलमध्ये राहणारे एमबीबीएसचे विद्यार्थी शनिवारी रात्री जेवण व अभ्यास आटोपल्यावर झोपी गेले. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने वसतीगृहाच्या उघड्या दारातून आत प्रवेश करीत चार मोबाइल, एक लॅपटॉप व टॅब असा ६८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबविला. रविवारी सकाळी झोपेतून उठल्यावर विद्यार्थ्यांना आपले मोबाइल, टॅब व लॅपटॉप दिसून आले नाही. चोरी झाल्याची बाब लक्षात आल्यावर पीडीएमसीत एकच खळबळ उडाली. या प्रकरणी संघर्ष प्रफुल्ल बनकर (२३, रा. डोंगरी, भंडारा) याने गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
मोठी चोरी झाल्याची होती चर्चारविवारी पीडीएमसीमधील चोरीबाबत मोठी चर्चा होती. प्रथमदर्शनी अज्ञात चोरांनी तेथील होस्टेलमधून पाच साडेपाच लाखांचा मोठा ऐवज चोरून नेला असावा, अशी शक्यता तेथील काही विदयाथ्यांनी व्यक्त केली. त्याबाबत दुपारपर्यंत मोठी चर्चा देखील रंगली होती. प्रत्यक्षात होस्टेलमधील केवळ चार मोबाईल व प्रत्येकी एक टॅब व लॅपटॉप चोरीला गेल्याची तक्रार नोंदविण्यात आली. त्यामुळे पीडीएमसीतून लाखोंचा ऐवज लंपास झाल्याची चर्चा केवळ चर्चाच निघाली.
प्रदीप भाकरे