शहरं
Join us  
Trending Stories
1
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा
2
Nobel Peace Prize 2024: अण्वस्त्रांविरोधात काम करणाऱ्या संस्थेचा नोबेल शांतता पारितोषिकाने सन्मान
3
हरयाणानंतर महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपाचा खास प्लॅन, या ३० जागांवर देणार विशेष लक्ष, समीकरणं बदलणार? 
4
वक्फ विधेयकावर आता जमियत उलेमा-ए-हिंदचे मत घेणार; राम मंदिराच्या वकिलांनाही जेपीसीच्या बैठकीचे निमंत्रण
5
Harry Brook, PAK vs ENG: "अजून बरीच शतकं ठोकणार..."; पाकिस्तानी गोलंदाजांना 'त्रिशतकवीर' हॅरी ब्रूकने दिला इशारा
6
पॅराग्लायडिंग करत असताना पॅराशूटचा तोल गेला, तरुण खाली कोसळला, पण सुदैवाने वाचले प्राण
7
प्रकाश आंबेडकर यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त केली महत्त्वाची मागणी
8
"स्वामींनीच त्याला माझ्यासमोर आणलं", केदार शिंदेंनी सांगितलं सूरज चव्हाणच्या निवडीबद्दल
9
दुसऱ्या प्रेग्नंसीवर व्यक्त झाली आलिया भट; म्हणाली, "भविष्यात सिनेमांसोबतच आणखी..."
10
Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा?
11
Ratan Tata Successor : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
12
Jigra Movie Review: जिगरबाज बहिणीची डेअरिंगबाज कहाणी, आलिया भटचा 'जिगरा' कसा आहे वाचा
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; दिवाळीपूर्वीच सोन्याला पुन्हा झळाळी
14
खामेनेईंना सत्तेवरून हटवण्यासाठी इस्रायलकडून मोहीम, इराणला टारगेट करण्यास मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल
15
हिंद महासागरात चक्रव्यूह...! भारताची पकड आणखी मजबूत होणार; चीनला देणार टक्कर
16
पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले...
17
मुलाकडून विरोध तर वडिलांकडून मदतीचं आवाहन, कागलच्या राजकारणात पुन्हा नवा 'ट्विस्ट'!
18
"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
19
शरद पवारांची खेळी उलटणार?; इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात स्थानिक नेते एकटवले
20
"आम्हाला शक्य तितक्या लवकर..."; घरच्या मैदानात लाज गेल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे विधान

शिक्षकबदली प्रश्न मार्गी लावू

By admin | Published: November 07, 2016 12:19 AM

मागील आठ वर्षांपासून प्रलंबित असलेली शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तत्काळ सुरू करावी,

निवेदन सादर : पालकमंत्री प्रवीण पोटे यांचे आश्वासनअमरावती : मागील आठ वर्षांपासून प्रलंबित असलेली शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तत्काळ सुरू करावी, या मागणीसह इतर प्रमुख मागण्या घेऊन दोन नोव्हेंबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू झालेल्या बेमुदत धरणे व उपोषण आंदोलनाच्या आज पाचव्या दिवशी शहरात पालकमंत्री प्रवीण पोटे दाखल होताच त्यांनी आंदोलनाची दखल घेत आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले. यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य समन्वयक महेश ठाकरे यांच्या नेतृत्वात बदलीग्रस्त शिक्षकांनी पालकमंत्री पोटे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले . शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न दिवसेंदीवस तापत असुन अद्याप पर्यंत आंदोलनाच्या पाचव्या व आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा प्रशासनाने आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आंदोलनकर्ते शिक्षक अधिकच तापले आहेत. प्रशासनाने तीन दिवस धरणे आंदोलनाची दखल न घेतल्याने काल चार नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री , ग्रामविकास मंत्री व शिक्षणमंत्री याची महाआरती ओवाळून आमरण उपोषणाची सुरवात करण्यात आली . पहिल्या दिवशी पंधरा शिक्षक उपोषणाला बसलेत ज्यात दोन शिक्षिका व तेरा शिक्षकांचा समावेश आहे. आंतरजिल्हा बदलीसाठी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीही प्रशासनाने कुठलीच दखल न घेतल्यामुळे शहरात दाखल होताच पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बदलीग्रस्त शिक्षकांच्या आंदोलनाची दखल घेत बदलीग्रस्त शिक्षकांच्या शिष्टमंडळासोबत वाढदिवसाच्या भरगच्च कार्यक्रमातही सविस्तर चर्चा केली व समस्या जाणून घेतल्या. आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांवरील अन्याय दुर करून लवकरच या प्रश्नाचा छळा लावण्यात येईल. याप्रकरणी नियमबाह्यपणे शिक्षकांची पदे भरणाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी आपण शासन स्तरावर करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. बदलीग्रस्त शिक्षकांना न्याय मिळवून देऊ, अशी ग्वाहीसुद्धा प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य समन्वयक महेश ठाकरे व त्यांच्या शिष्टमंडळाला पालकमंत्र्यांनी दिली. विशेष म्हणजे आंदोलन सुरू केल्यानंतरही याची दखल प्रशासकीय यंत्रणेने घेतली नाही. यामुळे उपोषणकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)पालकमंत्री उपोषणकर्त्या शिक्षकांना भेटणारपालकमंत्री प्रवीण पोटे सोमवारी बदलीग्रस्त आंदोलनकर्त्या शिक्षकांच्या उपोषण मंडपाला भेट देऊन विभागीय आयुक्तांशी चर्चा करणार आहेत . आंतरजिल्हा बदली प्रश्नी शिक्षकांवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाहीसह भूमिपूत्र शिक्षकांना न्याय मिळवून देण्याबाबत आग्रही भूमिका मांडणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.