अमरावती : जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी घरकूल मिळाले आहे. आणि ते सध्या या घरात राहत आहेत. अशा लाभार्थ्यांनी शासनाच्या विविध सोशल मीडियावर यांचा आनंद साजरा करण्यासाठी समग्र आवास मोहीम ५ ते २० जूनपर्यंत जिल्हा परिषदेमार्फत राबविली जात आहे. यामध्ये स्वत:चा घरासोबत सेल्फी काढून तो शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करावयाचा आहे. याची अंमलबजावणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत केली जात आहे. जिल्हाभरात प्रधानमंत्री आवास योजनेमधून गत दोन वर्षांत ९८ हजार २९७ घरकुले मंजूर केलेली आहेत.
यापैकी ८४ हजार ८९ लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्याचे अनुदान दिले आहे. त्यानंतर ७५ हजार ९५९ लाभार्थींना दुसरा टप्पा, ७२ हजार ७२६ ला तिसरा व घरकुलाचे काम पूर्ण केल्यानंतर ६० हजार ३५० लाभार्थ्यांना चौथ्या टप्प्यामधील अनुदान दिले आहे.
यामध्ये ७१ हजार ८४ लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम पूर्ण करून हे लाभार्थी आपल्या हक्काच्या घरकुलामध्ये वास्तव्यास गेले आहे. त्यांचा आनंद द्विगुणित झाल्याने तो आनंद आता शासनासोबत साजरा करण्यासाठी आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत समग्र आवाहन मोहीम राबविली जात आहे.
सीईओ अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम जिल्ह्यात राबविली जात असल्याची माहिती प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांनी दिली. २०१७ पासून आतापर्यंत पूर्ण झालेल्या घरकुलाचे सेल्फी फोटो घरकुलाच्या लोगो व लाभार्थ्यांची घरासोबत सेल्फी काढून शासनाच्या अधिकृत सोशल मीडिया हॅडलवर ( एमआरडीच्या खालील अधिकृत हॅडलला टंग करत फोटो पोस्ट केले जात असल्याचे डीआरडीएकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात यासाठी जनजागृती मोहीम राबविली जात आहे.
झेडपीच्या वेबसाईटवर टाका छायाचित्र
समग्र आवास योजनेंतर्गत घरकूल योजनेमधील लाभार्थ्यांना आपल्या सेल्फी स्वत:च्या घरासमवेत फोटो काढून जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर पाठवायचा आहे. झेडपीद्वारे ही मोहीम राबविली जात आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून प्राप्त निर्देशानुसार ही मोहीम राबविली जात असल्याचे प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांनी सांगितले.