लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कीटकनाशकांच्या विषबाधेला केवळ कृषिनिविष्ठा विक्री केंद्रचालकांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येत असल्याने व्यवसाय करणे कठीण झाले आहे. चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, यासह अन्य मागण्यासाठी जिल्हा कृषी निविष्ठा संघाच्यावतीने जिल्हाधिकाºयांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले.कीटकनाशकांच्या विषबाधेने शेतकरी व शेतमजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याविषयीचे दु:ख आम्हालाही आहे. मात्र, या प्रकरणात कृषी निविष्ठा विक्री केंद्रचालकांना वेठीस धरण्यात येऊन चुकीच्या पद्धतीने गंभीर कारवाई करण्यात येत आहे. हे गुन्हे मागे घ्यावे, आॅनलाइन परवान्यात समाविष्ट अर्ज ग्राह्य धरण्यात यावेत व परवान्यात कीटकनाशकांचे उगम प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी मुदत देण्यात यावी आदी मागण्या निवेदनात आहेत. संघाचे जिल्हाध्यक्ष विलास देशमुख, सचिव नीलेश गांदी आदी उपस्थित होते.
कृषी केंद्रचालकांवरील चुकीचे गुन्हे मागे घ्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 11:41 PM
कीटकनाशकांच्या विषबाधेला केवळ कृषिनिविष्ठा विक्री केंद्रचालकांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येत असल्याने व्यवसाय करणे कठीण झाले आहे.
ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांना निवेदन : कृषी साहित्य विक्रेता संघाची मागणी