अमरावती : केंद्र शासनाने नव्याने लागू केलेल्या गोवंश हत्या बंदी कायद्याविरोधात मंगळवारी आॅल इंडीया जमीयतुल कुरेश संघटनेच्या शहर शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देवून या कायद्यातील बैल शब्द हखविण्याची मागणी करण्यात आली आहे.केंद्र शासनाने गोवंशी बंदी कायद्या देशभरात लागू केला आहे या कायद्यामुळे पारंपारीक व्यवसाय असलेल्या कुरेशी समाजावर अन्याय झाला आहे . महाराष्ट्र प्रिझरवेशन अॅक्ट १९७६ अमलात होता. व यामध्ये गाईच्या कत्तलीला बंदी घालाण्यात आली होती. या कायद्यातील गोहत्या बंदीचे कुरेसी समाज समर्थन करीत आहेत. परंतु नविन कायद्यात गोवंश हत्या बंदी संदर्भात लागू केलेल्या तरतूदी मध्ये बैल शब्द हटवून बैलाच्या कत्तलीची परवानगी देण्यात यावी अशी मागणी आॅल इंडीया जमीयतुल कुरेश संघटनेने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या मार्फ त पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे. आंदोलनात जमीयतुल कुरेश संघटनेचे शहरध्यक्ष एन. ए. कुरेशी, आझाद कुरेशी, हाजी जफर कुरेशी, हमीद शद्दा, सादीक आयडीया, शेख सुलतान, सादीक कुरेशी, सादीक शाहा, अब्दुल फहीम, शब्बीर कुरेशी उपस्थित होते.
गोवंश हत्याबंदी कायद्याविरुद्ध धरणे
By admin | Published: April 01, 2015 12:25 AM