लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रफुल्ल कांबळेच्या संशयास्पद मृत्युची सखोल चौकशी करावी, अन्यथा उषोपणावर बसू, असा इशारा बुधवारी कांबळे कुटुंबीयांसह केमिस्ट्र अॅन्ड ड्रगिस्ट असोशिएशनने पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांना निवेदनातून दिला आहे.आठ दिवसांपूर्वी मार्डी रोडवर प्रफुल्ल पुरुषोत्तम कांबळे याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. फे्रजरपुरा पोलिसांनी याची चौकशी सुरू केली. प्रफुल्लच्या शवविच्छेदन अहवालात त्याचा मृत्यू मद्यप्राशन किंवा विषबाधेने झाल्याचा अंदाज वर्तविला आहे. मात्र, त्याची हत्या करून मृतदेह फेकल्याचा संशय कांबळे कुटुंबीयांना वर्तविला. ९ सप्टेंबर रोजी तो बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईकांनी मार्डी रोकवर शोध घेतला. मात्र, दिसला नव्हता. मग १२ सप्टेंबर रोजी मृतदेह तेथे आला कसा, हा प्रश्न नातेवाईकांना पडला. प्रफुल्ल त्याचा एॅमआर मित्र राहुल वढे यांच्या मोपेड वाहनासह घटनास्थळी आढळला आहे. त्या मोपेडच्या डिक्कीत ड्राय कफवर उपयोगी पडणारी व नशा येणाऱ्या औषधीची बॉटल मिळाली. प्रफुल्लने ती औषधी पिली असावी, असा संशय पोलिसांना आहे. मात्र, राहुलच्या म्हणण्यानुसार, ती औषधीची बॉटल रिकामी होती व ती वेळप्रसंगी पेट्रोल काढण्यासाठी ठेवली होती. त्यामुळे प्रफुल्लने ती औषधी पिल्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या सर्व बाबी लक्षात घेता, प्रफुल्लची हत्या करून मृतदेह फेकण्यात आल्याचे दिसून येत असल्याचे प्रफुल्लच्या नातेवाईकांसह मेडीकल व्यवसायीकांचे म्हणणे आहे. निवेदनदेतीवेळी प्रफुल्लचा भाऊ संजय कांबळे, अमरावती केमीस्ट्र अॅन्ड ड्रगिस्ट असोशिएशनचे अध्यक्ष सौरभ मालाणी, सचिन प्रमोद भारतीया, उपाध्यक्ष संजय शेळके यांच्यासह आदी उपस्थित होते.
प्रफुल्ल कांबळेच्या घातपाताची सखोल चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 10:14 PM
प्रफुल्ल कांबळेच्या संशयास्पद मृत्युची सखोल चौकशी करावी, अन्यथा उषोपणावर बसू, असा इशारा बुधवारी कांबळे कुटुंबीयांसह केमिस्ट्र अॅन्ड ड्रगिस्ट असोशिएशनने पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांना निवेदनातून दिला आहे.
ठळक मुद्देहत्येचा संशय : कुटुंबीय, केमिस्ट्र, ड्रगिस्टचे सीपींना निवेदन