चांदूर रेल्वे : तालुक्यातील तलाव, प्रकल्पस्थळी संरक्षणात्मक उपाय म्हणून एसओपीनुसार उचित कारवाई करावी, असे निर्देश तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी कार्यकारी अभियंता, उपविभागीय जलसंधारण अधिकारी व शाखा अधिकारी यांना २० सप्टेंबर रोजी पत्राद्वारे दिले.
बासलापूर तलावात १९ सप्टेंबर रोजी एका १८ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला तसेच यापूर्वी सरस्वती तलाव आणि सोनगाव शिवनी प्रकल्पाचे ठिकाणी काही व्यक्तींचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील तलाव, प्रकल्पस्थळी संरक्षणात्मक उपाय म्हणून एसओपीनुसार उचित कारवाई करावी तसेच तलावाच्या ठिकाणी दोन्ही बाजूच्या भिंतींना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सूचना असलेले फलक दर्शनी भागावर लावण्याबाबतची कारवाई तत्काळ करावी आणि त्याबाबतचा अहवाल या कार्यालयास सादर करण्याचे निर्देश तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी सोमवारी यवतमाळ येथील बेंबळा प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता, अमरावती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद लघुपाटबंधारे उपविभाग, चांदूर रेल्वेचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी व चांदूर रेल्वेचे सिंचन शाखा अधिकारी यांना पत्राद्वारे दिले आहे.
240921\2121img-20210921-wa0027.jpg
photo