शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

गर्भलिंग निदान कायद्यात शिथिलता आणा

By admin | Published: April 15, 2015 11:51 PM

प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान कायद्यातील अव्यावहारिक तरतुदींमध्ये शिथिलता आणावी, या मागणीसाठी स्त्रीरोग व

प्रसूूतिशास्त्र तज्ज्ञ संघटनेची मागणी : २०० सोनोग्राफी केंद्रातील डॉक्टरांचा संपअमरावती : प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान कायद्यातील अव्यावहारिक तरतुदींमध्ये शिथिलता आणावी, या मागणीसाठी स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ संघटनेने सोमवारी एक दिवसीय संप पुकारला. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना या संघटनेने मागण्यांचे निवेदन दिले. त्यामुळे शहरातील १७५ प्रसूतीतज्ज्ञ व २२ रेडिओलॉजिस्ट डॉक्टरांंची सोनोग्राफी केंद्रे बंद होती. सोमवारी केवळ आपात्कालिन स्थितीतील सोनोग्राफीची व्यवस्था सुरू ठेवण्यात आली होती. गर्भलिंग निदान कायदा (पीसीपीएनडीटी) अस्तित्वात आल्यापासून सोनाग्राफी करणाऱ्या डॉक्टरांना चार पानी कागदपत्र बिनचूक भरणे आवश्यक झाले आहे. या अहवालात एखादीही चूक आढळल्यास डॉक्टरांना दंड व कारावासाची शिक्षा सुनावण्यात येत आहे. प्रत्यक्ष गर्भलिंगनिदान करणे व रेकॉर्ड भरताना क्षुल्लक चूूक करणे, या दोन्हीसाठी कायद्यामध्ये दंड व शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. दोन्ही बाबी वेगवेगळया असतानाही कायद्यामध्ये एकच कलम व एकाच शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. कायद्यातील अव्यावहारिक तरतुदीमुळे डॉक्टरांची पिळवणूक होत असल्याचा सोनोग्राफी तज्ज्ञांचा आरोप आहे. काही निर्दोष डॉक्टरांवर गुन्हे सुध्दा दाखल करण्यात आले आहेत. ही बाब अन्यायकारक आहे.