शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
4
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
5
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
6
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
8
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
9
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
10
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
11
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
12
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
13
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
14
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
15
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
16
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
17
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
18
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
19
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
20
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न

गण, गटांच्या निश्चिततेसाठी लोकसंख्येची तालुकानिहाय माहिती आयोगाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:09 AM

अमरावती : जिल्हा परिषद व त्याअंतर्गत ११ पंचायत समित्यांची सदस्यसंख्या निश्चित करण्यात येणार आहे. याकरिता सन २०११ ची लोकसंख्या ...

अमरावती : जिल्हा परिषद व त्याअंतर्गत ११ पंचायत समित्यांची सदस्यसंख्या निश्चित करण्यात येणार आहे. याकरिता सन २०११ ची लोकसंख्या व त्यामध्ये समाविष्ट अनुसूचित जाती-जमातीची लोकसंख्या याची माहिती मंगळवारी जिल्हा निवडणूक विभागाद्वारे आयोगाला पाठविण्यात आली.

जिल्हा परिषदेसह ११ पंचायत समित्यांची मुदत मार्च २०२२ रोजी संपुष्टात येणार आहे. त्याअनुषंगाने वेळेच्या आत सार्वत्रिक निवडणूक घेण्यासाठी आयोगाची लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यात चार तालुक्यांच्या मुख्यालयी नगरपंचायतींचे गठण करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित गण व गटांतील मतदारसंख्या कमी झाली आहे. त्या अनुषंगाने आता प्रभागरचना व आरक्षण निश्चिती करण्यात येणार आहे. याकरिता नगर परिषद, नगरपंचायत व महापालिकेची झालेली हद्दवाढ वगळून उर्वरित क्षेत्राची माहिती आयोगाला अनुसूचित जाती व जमातीच्या लोकसंख्येसह सादर करण्यात आली व या माहितीच्या आधारेच आता जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समितीचे गण यांची निश्चिती होणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.

शेंदूरजना नगर परिषदेची क्षेत्रवाढ झाल्याने १२,४८२ व व चार नगरपंचायतीची मिळून ५१,२१२१ लोकसंख्या आता नागरी क्षेत्रात आल्याने ग्रामीण मधून वगळण्यात येणार आहे. याशिवाय दर्यापूर नगर परिषदेची क्षेत्रवाढ झाली आहे व नगरविकासद्वारा ही उद्घोषणा झाल्यास ६,७५५ लोकसंख्यादेखील ग्रामीण भागातून वगळण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

बॉक्स

जिल्ह्यातील तालुकानिहाय ग्रामीण लोकसंख्या

तालुका लोकसंख्या अनु.जाती अनु.जमाती

चिखलदरा १,०८,५१३ ७,१३४ ८७,४४५

चांदूर बाजार १,७५,७६६ ३४,४५३ १४,५१७

मोर्शी १,४५,१५१ २५,६१२ १६,४४२

वरूड १,५७,१७३ २४,३२२ २८,१९४

तिवसा ९२,२४६ १५,२८३ ३,५८६

अमरावती १,४१,२७० ३३,५४१ ८,८२२

अचलपूर १,७१,५९४ ३३,२८१ २५,४६७

धारणी १,६७,१७७ ६,३५५ १,३७,२१०

अंजनगाव सुर्जी १,०४,५२३ २७,०५७ ३,५९९

दर्यापूर १३८,५९८ ४१,४१० ११,२५७

भातकुली १,०४,२९३ २७,०१७ ६,३३९

चांदूर रेल्वे ७७,१३१ १६,५०६ ४,१४१

धामणगाव १,११,८५६ १९,३६८ ८,९९२

नांदगाव खंडेश्वर १,१६,२३८ २९,०९३ ४,९०२३

एकूण १८,११,५२९ ३,४०,४४२ ३,६१,४३४