चांदूररेल्वे : नगर परिषदेतील महाघोटाळ्याबाबत पुरावे सादर करून चौकशी अहवाल पाठविल्यानंतरही दोषींवर कारवाईची प्रकिया कासवगतीने होत असल्याने गौतम जवंजाळ यांनी सोमवारपासून पुन्हा उर्दू शाळेसमोरील विहिरीत टांगते उपोषण सुरू केले आहे. उपोषणस्थळी बघ्यांची एकच गर्दी उसळली आहे.चांदूररेल्वे नगर परिषद अनेक महिन्यांपासून भ्रष्टाचाराच्या मुद्यावर जिल्हाभर गाजत आहे. गरीब नागरिकांसाठी शासनाने घरकुल योजना काढली होती. मात्र चांदुर रेल्वे नगर परिषदेंतर्गत अनेक गरीब नागरिक या योजनेपासून वंचित राहील. घरकुलाचा लाभ शहरवासीयांच्या सेवेकरीता असलेलेच नगरसेवक, कर्मच्यारी व ज्यांना घरकुलाची आवश्यकता नाही अशांना तीन-तीन घरकुलांचा लाभ दिला जातो. यामध्ये न.प. कार्यालयासमोर सुरू असलेल्या व्यापारी संकुलाचे अनियमित बांधकामावर कारवाई करण्यात यावी, न.प.च्या घरकूल योजनेत झालेला भ्रष्टाचार व घरकूल योजनेंतर्गत नागरी सुविधासाठी साडेतीन कोटी रूपयाचे अनुदान अखर्चिक असून नागरिकांना नागरी सुविधा न मिळाल्याबाबत, नगरपालिकेचे पाच नगरसेवक व आजी व माजी कर्मचाऱ्यांनी एकापेक्षा जास्त घरकूल लुबाडून केलेल्या गैरप्रकारावर फौजदारी कारवाई करण्याबाबत, मिलिंदनगरातील महिलाचे प्रसाधनगृह सात दिवसांत दुरूस्त करून सुरू करण्यात यावे असा आदेश खा. रामदास तडस यांनी दिला आहे.दोषींना अभय कुणाचे?चांदूररेल्वे : त्याची त्वरिीत अमंलबजावणी करण्यात यावी, एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी सुधार संलग्न कार्यक्रम २००६-०७ मध्ये मंजुर झालेल्या घरकुलाची रक्कम लाभार्थी दुर्गा जवंजाळ यांना त्वरीत देण्यात यावी, म्हाडाचे ३९७ मंजूर घरकुलावर शासनाने मंजूर केलेल्या ७५ हजार रुपये वाढीव निधी किती लाभार्थ्यांना देण्यात आले. अपात्र कंत्राटदारकडून महालक्ष्मीनगर व मदारी वस्तीतील तातडीच्या पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी न.प. पाणीपुरवठा अभियंत्यांच्या लेखी लक्षात आणुन दिल्यानंतर त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे दोषींवर कारवाई करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी सच्चा सामाजिक कार्यकर्ते गोतम अण्णाजी जवंजाळ २४ जानेवारीपासून उपोषणाला बसले होते. उपोषण मंडपाला खासदार रामदास तडस यांनाही भेट दिली हो़ती. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी २९ जानेवारीला उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे यांना ५ सदस्यीय समितीचे गठन करून १० दिवसांत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे यांनी उपोषणकर्ते गौतम जवंजाळ यांच्यासोबत उपोषणमंडपात चर्चा केली व येत्या १० दिवसांत कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले होते. आश्वासनाला ९० दिवस लोटूनही अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. अनेक दिवसांपासून चौकशी समितीचा अहवाल जिल्हाधिकारी यांचेकडे पाठविल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)
चांदूररेल्वेत शाळेच्या विहिरीत टांगते आंदोलन; दोषींवर कारवाई नाही
By admin | Published: April 25, 2016 11:59 PM