शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

अमरावती जिल्ह्यात लसीकरणासाठी 'टास्क फोर्स' सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 1:08 PM

Amravati news corona कोरोना लसीकरण लवकरच होणार आहे. लसीकरणाचे प्रभावी नियोजन व अंमलबजावणीसाठी जिल्हा, तालुकास्तरीय टास्क फोर्स स्थापन केले आहेत.

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात १६ हजारांवर हेल्थ केअर वर्करना कोरोना लस, शीत केंद्र तयार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना लसीकरण लवकरच होणार आहे. लसीकरणाचे प्रभावी नियोजन व अंमलबजावणीसाठी जिल्हा, तालुकास्तरीय टास्क फोर्स स्थापन केले आहेत. शीत साखळी केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. डीप फ्रीजर, आईसलाईन रेफ्रिजरेटर सज्ज ठेवण्यात आले आहेत. पहिल्या टप्यात १६ हजार २६१ हेल्थ केअर वर्कर यांचे लसीकरण होणार आहे. लसीकरणाची पूर्वतयारी जोरात सुरू आहे.जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, लसीकरणासंदर्भात जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय टास्क फोर्स स्थापन झाले आहेत. जिल्हास्तरावरील फोर्सचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आयएमएचे प्रतिनिधी, धार्मिक नेते यांच्यासह २५ प्रतिनिधींचा समावेश आहे. तालुकास्तरीय टास्क फोर्समध्येही २० ते २२ प्रतिनिधींचा समावेश आहे. जिल्हाधिका?्यांकडून टास्क फोर्सवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर संबंधितांना कळविले जाणार आहे. कोरोनाच्या लशींसाठी आरोग्य यंत्रणेकडील उपलब्ध शीत साखळी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. जिल्ह्यात १०१ शीत साखळी केंद्रे आहेत. डीप फ्रीजर १३४, त्याची क्षमता १३१३२ लिटर इतकी आहे. आईसलाईन रेफ्रिजरेटर १३३ आहेत. व्हॅक्सिन कॅरिअर ४४८१, कोल्ड बॉक्स २५५ आहेत. कोल्ड बॉक्स पॅक हे उणे १५ ते उणे २५ अंश सेल्सिअस तापमानाला गोठवलेले असतात.दोन लशींचा डोसकोरोना प्रतिबंधक दोन लशींचा डोज आहे. पहिली लस टोचल्यानंतर एक महिन्याने दुसरी लस टोचली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्करना लस टोचली जाणार आहे. शासकीय, निमशासकीय आरोग्य यंत्रणा, खासगी आरोग्य यंत्रणेकडील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण होणार आहे. ग्रामीण भागातील १३० संस्थांमधील ७५७० शासकीय, तर ३८६ खासगी संस्थांमधील ८६९१ अशा एकूण ५१५ संस्थामधील १६ हजार २६१ हेल्थ केअर वर्करना लसीकरण होणार आहे. लस उपलब्ध होण्यास अवकाश असला तरी प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.लसीकरणाची तारीख, वेळ मोबाईलवरलसीकरणाच्या चौथ्या टप्यात सर्वसामान्य व्यक्तींना (हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर, हायरिस्क व ५० वर्षावरील व्यक्ती वगळून उर्वरित सर्व व्यक्ती) लस टोचली जाणार आहे. वेबसाईट अथवा अ?ॅपवर लसीकरणासाठी नावनोंदणी करता येणार आहे. नाव, पत्ता, आधार कार्ड नंबर अपलोड केल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या मोबाईल नंबरवर मेसेज येणार आहे. लसीकरणाची तारीख, वेळ आणि ठिकाण याची माहिती या मेसेजद्वारे कळविली जाणार आहे. लसीकरण झाल्याचे आॅनलाईन प्रमाणपत्रही मिळणार आहे. ते सेव्ह करून ठेवता येईल...........................................................................................................................................

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या