परतवाडा : अमरावती जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या कार्याध्यक्षपदी अचलपूर येथील विनोद तट्टे व संघटक म्हणून योगेश उमक यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा शाखेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. ही निवडणूक सर्व सदस्यांच्या सहकार्याने बिनविरोध झाली. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी.टी. गावंडे व पर्यवेक्षक म्हणून राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी जबाबदारी सांभाळली. अमरावती विभागीय अध्यक्ष बबनराव कोल्हे, सहसचिव चांद कुरेशी आणि अमरावती जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे नेते डॉ. उल्हास मोकलकर उपस्थित होते. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी तालुकाध्यक्ष व सचिव यांची भूमिका महत्त्वाची ठरली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष म्हणून कमलाकर वनवे यांची पाचव्यांदा निवड करण्यात आली.
जिल्हा सरचिटणीसपदी आशिष भागवत यांची सलग दुसऱ्यांदा वर्णी लागली. जिल्हा कार्यकारणीमध्ये मानद अध्यक्षपदी विलास बिरे, कार्याध्यक्ष विनोद तट्टे, महिला उपाध्यक्ष पुष्पा भुयार, कोषाध्यक्ष नंदलाल पतालिया, उपाध्यक्ष प्रवीण गिरे, दीपक राठोड, प्रदीप निचले, पुरुषोत्तम राऊत, सहसचिव प्रशांत टिंगणे, मनीष इंगोले, संघटक सुनील मोंढे, योगेश उमक, राजेश भडांगे, महिला संघटक पौर्णिमा अडकणे, जिल्हा समन्वयक राजकुमार चांदुरकर, सल्लागार वीरेंद्र कोकाटे, सुनील केने, लेखापरीक्षक कमलाकर घोंगडे, प्रसिद्धीप्रमुख रूपेश वानखडे, प्रवीण साखरे यांची निवड केली गेली.