कापूस व्यवसाय, लेखापालासह तिघांना अटक
अमरावती : कापूस खरेदी विक्रीसाठी बनावट फर्म काढून एका टोळक्याने
१२ कोटी रुपयांची करचोरी केल्याचा प्रकार येथे उघड झाला. याप्रकरणी अमरावती ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एका अकाउंटटसह तिघांना अटक केली. गोपाळ निर्मळ, संजय प्रयाल, संजय साहू अशी अटक आरोपींची नावे आहेत.
तिनही आरोपींनी कापुस खरेदी विक्रीच्या व्यवहारात स्वत:च्या आर्थिक फायद्याकरीता कट रचला. शेतमजूर कैलास राऊत यांचे कागदपत्रे घेऊन मोर्शी येथे रॉयल एंटरप्रायजेस नावाची बनावट फर्म सन २०१० मध्ये काढली. त्या फर्ममार्फत अमरावती व अन्य जिल्हायातील कापुस व्यापाºयांसोबत सन २०१० ते २०१६ या कालावधीत शेकडो कोटींचा कापूस खरेदी विक्री व्यवहार केला. त्याअनुषंगाने मोर्शी पोलीस ठाण्यात तीनही आरोपींविरूद्ध भादंविचे कलम ४२०, ४१९, ४७१, १२० ब, १७७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपींनी वरूड येथे आॅटोचालक विनायक तळोकार यांच्या नावे महाराष्टÑ ट्रेडिंग कंपनी, अमरावती येथील पेपर विक्रेता सुरेश अनासाने यांचे नावे विदर्भ कॉटन, अशा वेगवेगळ्या नावाने बोगस फर्म स्थापन करून, कोट्यवधींचा व्यवहार करून शासनाची १२ कोटी रुपयांची करचोरी व बुडवेगिरी केली आहे. अमरावती शहरातील इतर फर्मने देखील सदर बोगस फर्म स्थापन करण्यामध्ये मदत करून आयटीसीचा लाभ घेतला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तीनही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून या तपासात कापुस व्यापाºयांच्या क ोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची तपासणी करण्यात येत आहे.
---