लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : खरीप हंगाम सुरू झाला असून, पेरणीकरिता सोय नसल्यामुळे शेतकरी पीक कर्जाकरिता बँकेत अर्ज करतात. बँकेचे अधिकारी मात्र अनावश्यक कागदपत्रांकरिता शेतकऱ्यांना त्रास देत असून, नो-ड्यूज दाखल्याची बळजबरी बँक करीत असल्याची तक्रार युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी जिल्हाधिकारी व खासदार आनंदराव अडसुळ यांच्याकडे केली. यावेळी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात बँक अधिकाऱ्यांची बैठक बोलावून खा. अडसूळ यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना खडसावले.पेरणीचा हंगाम सुरू झाला असताना, शेतकरी पेरणीच्या तयारीत आहेत. बी-बियाण्यांकरिता पैसे नसल्यामुळे बँकेकडे कर्ज मिळण्याकरिता अर्ज करून वारंवार चकरा मारत आहेत. परंतु, राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांची पिळवणूक करीत असून, त्यांच्याकडून नाहक कागदपत्रे मागवून व बँकेच्या नो ड्युज दाखल्याची मनमानी फी घेत आहे. वास्तविक, या दाखल्याकरिता शेतकऱ्यांकडून कुठलीही फी घेऊ नये, असे शासनाचेच परिपत्रक असल्याचे मारोटकर यांनी सांगितले. खा. अडसूळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात या मुद्द्यावर झालेल्या बैठकीत बँकेच्या क्षेत्रीय प्रबंधकांना धारेवर धरून जिल्ह्यात एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहिल्यास बँक अधिकाºयांना शिवसेना धडा शिकवेल, असा इशारा दिला. शेतकऱ्यांना बँकांनी सहकार्य न केल्यास व दाखला फी घेतल्यास बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा गंभीर इशारा जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी बैठकीत दिला. यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर, सरपंच गोकुळ राठोड, सुरेश राजगुरे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.बँकेत अडचण गेल्यास संपर्क साधाबँकेत कर्जासंबंधी शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांनी त्रास दिल्यास अनावश्यक कागदपत्रे मागितल्यास नो ड्युजकरिता पैसे मागितल्यास आमच्याशी ९४२१७३९१०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मारोटकर यांनी केले.
कर्जवाटपावरून अडसुळांनी बँक अधिकाऱ्यांना खडसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 10:48 PM
खरीप हंगाम सुरू झाला असून, पेरणीकरिता सोय नसल्यामुळे शेतकरी पीक कर्जाकरिता बँकेत अर्ज करतात. बँकेचे अधिकारी मात्र अनावश्यक कागदपत्रांकरिता शेतकऱ्यांना त्रास देत असून, नो-ड्यूज दाखल्याची बळजबरी बँक करीत असल्याची तक्रार युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी जिल्हाधिकारी व खासदार आनंदराव अडसुळ यांच्याकडे केली. यावेळी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात बँक अधिकाऱ्यांची बैठक बोलावून खा. अडसूळ यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना खडसावले.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : ‘नो ड्युज’चे शुल्क नको; युवा सेनेच्या आंदोलनाला यश