अमरावती : ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी आणि पराभूत उमेदवारांना मतदानाच्या ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक आहे. यंदा प्रथमच ऑनलाईन खर्च सादर करावा लागत असल्याने उमेदवारांची चिंता वाढली आहे. ट्रू व्होटर ॲपवर खर्च सादर केल्यानंतर त्याची प्रिंट संबंधित तहसीलदारांना सादर करावी लागणार आहे.
जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या १,८२३ प्रभागांतील ४,९०३ सदस्यपदांसाठी निवडणूक झाली. यामध्ये १६ ग्रामपंचायती अविरोध झाल्यामुळे उर्वरित ५३७ ग्रामपंचायतींमध्ये १५ जानेवारीला मतदान व १८ जानेवारीला मतमोजणी झाली. यानंतर सर्व उमेदवारांना ३० दिवसांच्या आत उमेदवारी खर्च सादर करावा लागतो. प्रचलित निकषानुसार सात ते नऊ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी उमेदवारांना २५ हजार रुपये खर्चाची मुभा आहे. याशिवाय ११ ते १५ सदस्यसंख्येसाठी ३५ हजार आणि १५ ते १७ सदस्यसंख्येसाठी ५० हजार रुपये खर्चाची मुभा आहे. या निवडणुकीत निवडणूक खर्चासाठी बँकेत स्वतंत्र खाते उघडण्याचे निर्देश निवडणूक विभागाने दिले होते. मात्र, प्रत्यक्षात बहुतांश उमेदवारांनी या बँक खात्यातून व्यवहार केलेले नाहीत. त्यामुळे उमेदवारी खर्च सादर करताना आता अडचणी येत आहेत. आता ॲपद्वारे ऑनलाईन उमेदवारी खर्च सादर केल्यानंतर ऑफलाईन प्रिंट द्यावी लागणार असल्याने उमेदवारांची तारांबळ उडाली आहे.
बॉक्स
खर्च सादरीकरणात उमेदवारांमध्ये संभ्रम
ग्रामपंचायत निवडणुकीतील बहुतांश उमेदवारांना ऑनलाईन खर्च सादरीकरणाविषयीची पुरेशी माहिती नाही व त्यांना याविषयी पुरेशी माहिती मिळत नाही. त्यामुळे या ॲपद्वारे खर्च सादर करताना उमेदवारांना अडचणी येत असल्याने बहुतांश उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केलेला नसल्याचे दिसून आले.
बॉक्स
असा सादर करावा ऑनलाईन खर्च
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार उमेदवारांना निवडणुकीचा लागल्यापासून ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्च सादर करावा लागतो. यावेळी निवडणूक विभागाने ट्रू व्होटर ॲपचे माध्यमातून खर्च सादरीकरणास सांगितले आहे. उमेदवारांना अनेक अडचणी येत असल्याने ऑफलाईन खर्च सादरीकरणाकडेच त्यांचा कल आहे.
बॉक्स
खर्च सादरीकरणात मोबाईल रेंजचाही अडसर
जिल्हा ग्रामीणमध्ये ५३७ ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष निवडणुका झाल्यात. साधारणपणे ११ हजार उमेदवारांमध्ये ही लढत झाली. या गावांध्ये मोबाईल रेंजच्या मोठ्या अडचणी आहेत. याशिवाय मेळघाटातील बहुतांश गावांमध्ये कनेक्टिव्हिटीच मिळत नाही. त्यामुळे उमेदवार त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ऑफलाईन सादरीकरणाला त्यांची पसंती आहे.
कोट
निवडणुकीतील खर्चाची कागदपत्रे जमा केली आहेत. प्रचारादरम्यान झालेल्या खर्चाची बिलेदेखील रजिस्टरमध्ये नोंदविली आहेत. मर्यादेच्या आत खर्च केलेला आहे. खर्च तहसीलमध्ये ऑफलाईन सादर करू.
०००००००००,०००
कोट
खर्चाचे ऑनलाईन जमणार नाही. त्यामुळे आम्ही ऑफलाईनच निवडणूक खर्च सादर करू. निवडणुकीदरम्यान झालेला खर्च नोंद केलेला आहे व याच्या पावत्याही व्यवस्थित ठेवल्या आहेत. त्यामुळे मुदतीच्या आत निवडणूक विभागाकडे खर्च जमा करू.
००००००,०००