गुरुद्वाराचा उपक्रम : चवथ्या दिवशीही ‘रश’ ंबडनेरा : पाचशे व हजारांच्या नोटा बंद झाल्यानंतर सलग चवथ्या दिवशीदेखल बँकांसमोर नागरिकांनी गर्दी केली आहे. सकाळपासूनच तासन्तास रांगेत उभे असणाऱ्यांना सामाजिक भावनेतून बडनेरा गुरुद्वारा गुरुनानक दरबारच्यावतीने चहा व पाण्याचे वाटप करण्यात आले. बडनेऱ्यातील स्टेट व महाराष्ट्र बँकेसमोर पैसे काढणाऱ्या तसेच पैसे भरण्यांची सकाळपासूनच लांबच लांब रांग राहत आहे. तासन्तास रांगेत उभे राहणाऱ्यांमध्ये महिला, आबालवृद्ध, अपंगांची संख्या मोठी आहे. रांगेतून बाहेरदेखील जाता येत नाही. अशांना व गोरगरीब, सर्व सामान्य जनतेला सामाजिक भावनेतून बडनेऱ्याच्या गुरुद्वारा गुरुनानक दरबारच्यावतीने सर्वांना पाणी व चहाचे वाटप करण्यात आले. यावेळेस सतबीरसिंग अरोरा, हरभजनसिंग सलुजा, गुरुदयालसिंग हुडा, कुलबिरसिंग अरोरा, मंगेल गाले, राजू देवडा, हुपेंद्रसिंग बावरी, शर्माजी, पीवतसिंग बाबरी यांच्यासह इतरही सहभागी होते. (प्रतिनिधी)एटीएम डाऊनचबडनेऱ्यात पहिल्या दिवसांपासून एटीएमची सेवा मिळतच नसल्याने बँकांसमोर सारखी गर्दी राहत आहे. काही वेळा पुरतेच एटीएम सुरू केले जात आहे. नव्या वस्तीत चार एटीएम मशिन्स आहेत. त्याचा ग्राहकांना फारसा उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. इतर बँकांपेक्षा महाराष्ट्र व स्टेट बँकेसमोर ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. या दोन बँकांचा ग्राहकदेखील मोठ्या संख्येत आहे. जुन्या करंसिचा वापर करुन एटीएम सुरू ठेवावे, असे बोलल्या जात आहे.
बँकेसमोरील रांगांमध्ये चहा, पाण्याचे वाटप
By admin | Published: November 14, 2016 12:10 AM