अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावीची २९ एप्रिल आणि बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिलपासून होणार आहे. त्याअनुषंगाने बोर्डाने परीक्षांची तयारी चालविली असून, परीक्षा केंद्रांवर कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षक, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी होणार आहे. दहावीसाठी २,५११ तर, बारावीसाठी १,५१९ परीक्षा केंद्र असणार आहेत.
विभागीय शिक्षण मंडळाने अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलडाणा व अमरावती या पाचही जिल्ह्यांत दहावी, बारावीच्या परीक्षांचे नियोजन करण्यात येत आहे. शिक्षण मंडळाने कोविड -१९ च्या अनुषंगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे परीक्षा केंद्रांवर पालन होण्यासाठी तयारी सुरू केली आहे. यंदा दहावीत १,६४,६३२ तर, बारावीच्या परीक्षेसाठी १,३७,५६९ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहे.
बारावीच्या परीक्षांसाठी विभागातून परीरक्षक केंद, परीक्षा केंद्र. उपकेंद्र, परीक्षक, नियामक, वरिष्ठ नियामक आणि इतर कर्मचारी असे १८,३६७ मनुष्यबळ तैनात केले जाणार आहे. यात अमरावती विभागात केंद्र संचालक ४९८, उपकेंद्र संचालक ४९८, पर्यवेक्षक ६१६२, रिलिव्हर पर्यवेक्षक ९९६, स्टेशनरी पर्यवेक्षक ४९८, लिपिक ४९८, शिपाई ९९६, पाणीवाला १,४९४ अन्य घटक ४९८, मुख्य नियामक १०, वरिष्ठ नियामक ६, नियामक ७९७, परीक्षक ४४६०, परीरक्षक ७३, उपपरीरक्षक ७३, सहायक परीरक्षक ४९८, लिपिक ७३, शिपाई १४६ अन्य घटक ७३ असे मनुष्यबळ बारावीच्या परीक्षांसाठी नेमण्यात येणार आहे. अकोला २६८, अमरावती ३९५, बुलडाणा ३१७, यवतमाळ ३४८, वाशिम १९१ असे जिल्हानिहाय परीक्षा केंद्र असणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठी अकोला ४३९, अमरावती ६६५, बुुलडाणा ५०३,यवतमाळ ६०९, वाशिम २९५ असे जिल्हानिहाय परीक्षा केंद्र असणार आहे.
———————————
बारावीच्या परीक्षा केंद्रांवर असे राहील मनुष्यबळ
अकोला- २०९३
अमरावती -३१२५
बुलडाणा- २६४१
यवतमाळ - २७२४
वाशिम - १५७५
——————————
राज्य शिक्षण मंडळाच्या सूचनेनुसार दहावी, बारावीच्या ऑफलाईन परीक्षांचे नियोजन सुरू झाले आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीबाबत अद्याप काही गाईडलाईन नाही. मात्र, जवळपास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी झाली आहे. बोर्डात कर्मचाऱ्यांनी ९० टक्के चाचणी, लसीकरण आटोपले आहे.
- जयश्री राऊत, सहसचिव, विभागीय शिक्षण मंडळ