प्रत्येक गावात पहिली ते पाचवी या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी गावातील प्रमुख भिंतींवर जोडाक्षरे, बाराखडी गणिताचे विविध टेबल पोस्टर स्वरूपात लावून विद्यार्थ्यांना शिकता यावे अशा सोप्या भाषेत तयार करून लावले आहे. यामध्ये गणिताचे संबोध चार्ट, भौगोलिक विषयाची माहिती, एक ते शंभरपर्यंत पाढे, इंग्रजी बाराखडी, पार्ट ऑफ बॉडी आदी विविध विषयांचे ज्ञान यामध्ये समाविष्ट केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रामुख्याने शिक्षणापासून वंचित राहू नये, त्याला शिक्षणा प्रवाहात राहायला पाहिजे, यासाठी असे विविध उपक्रम राबवित असल्याचे स्थानिक शिक्षकांनी यावेळी सांगितले.
विद्यार्थी या चार्टमधून विविध विषयांची माहिती दररोज वाचत आहेत. यामध्ये इंग्रजीमध्ये फळांची नावे, स्वर-व्यंजन, महिना, वार, विविध देशांचे नकाशे, जिल्ह्यांचे नकाशे, प्राण्यांची माहिती व आपल्या शाळेमधील विविध विषयांची माहिती असते. त्यामुळे गावामध्ये शाळा सुरू नसल्या तरी शैक्षणिक वातावरण निर्माण झाल्याचे गावकरी बोलत आहेत.
--------------
शैक्षणिक जागृती विद्यार्थ्यांमध्ये व्हावी, विविध विषयाचे ज्ञान त्यांना व्हावे, यासाठी ‘माझे गाव - माझी शाळा’ ही संकल्पना राबवत आहोत.
- एम.के. राजनेकर, गटशिक्षणाधिकारी