अमरावती : आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत शिक्षकांनाही पन्नास लाखांचे विमा कवच शासनाने लागू केले. यादरम्यान कोविड सेवेत असताना दगावलेल्या शिक्षकांच्या कुटुंबाला मात्र अद्याप विम्याचा लाभ मिळालेला नाही. अशा राज्यातील ६८ शिक्षकांपश्चात कुटुंबांना त्वरित विम्याचा लाभ देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने राज्य शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यात दिवसाघडीला शिक्षकांच्या मृत्यूची संख्या वाढत आहे.
कोविड सेवेत कार्यरत असताना राज्यातील अनेक शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. शासनाची व जनतेची प्रामाणिकपणे सेवा करीत असताना शिक्षकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. आता कोविड क्लेम न मिळाल्यामुळे त्यांचे कुटुंबीय मात्र उघड्यावर पडले आहेत. शिक्षक वगळता इतर कर्मचाऱ्यांना मात्र लाभ मिळाला आहे. मात्र, कोरोनाकाळात कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या शिक्षकांना लाभ मिळाले नसल्याने प्राथमिक शिक्षक समितीने शासनाकडे पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.