विद्यार्थ्यांचाही सत्कार : शिक्षक दिन साजराअमरावती :भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेतर्फे टॉऊन हॉल, नेहरु मैदान येथे शिक्षकदिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी चरणजितकौर नंदा तर प्रमुख अतिथी आयुक्त चंद्रकांत गुडेवार, स्थायी समिती सभापती विलास इंगोले, विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर, गटनेता अविनाश मार्डीकर, गुंफाबाई मेश्राम, शिक्षण सभापती अब्दुल रफीक अब्दुल रज्जाक, महिला व बाल कल्याम समिती सभापती संगीता भेले, झोन सभापती मिलिंद बांबल, विधी उपसभापती सुनीता भेले, नगरसेवक अलका सरदार, नुरखां, सादिक शहा उपस्थित होते. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी अशोक वाकोडे यांनी केले. यावेळी तत्कालीन शिक्षणाधिकारी सविता चक्रपाणी, अरुणा डांगे, शिक्षिका नुरजहा बेगम मो. इकबाल, शिक्षक सै. अशफाकुर रहमान, सै. ईब्राहीम, मुख्याध्यापिका विद्या अढाऊ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन व आभार प्रदर्शन वैशाली कुऱ्हेकर यांनी केले. शाळा निरीक्षक प्रवीण पाटील, अजय बन्सेले यांनी या कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न केले.
महापालिकेत शिक्षकांचा गौरव
By admin | Published: September 06, 2015 12:09 AM