अमरावती : शाळा बंद असून, शिक्षणही थांबले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी अन्य विभागांचे कर्मचारी मदतीला घेतले आहेत. त्याअनुषंगाने माहुली जहागीर पोलिसांच्या मदतीला १५ शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश सोमवारी जारी करण्यात आले आहे.
मारोती घोडे (डवरगाव), नंदकुमार झाकर्डे (डवरगाव), विजय गाडबैल (चिचखेड), मिलिंद कोकाटे (चिचखेड), किशोर सोलव (धानोरा कोकाटे), विजय ठवळी (धानोरा कोकाटे), आशिष सापधरे (धानोरा कोकाटे), प्रवीण मारे (धानोरा कोकाटे), विजय सूर्यकर (ब्राम्हणवाडा गोविंदपूर), हरिभाऊ जावळे (ब्राम्हणवाडा गोविंदपूर), संभाजी रेवाळ (केकतपूर), गजानन होले (केकतपूर), संजय राऊत (केकतपूर), नरेंद्र जोशी (केकतपूर), सुनील यावलीकर (केकतपूर) यांचा समावेश आहे. या शिक्षकांना १८ मे रोजी सकाळी १० पासून पोलिसांच्या मदतीला पुढील आदेशापर्यंत कर्तव्य बजवावे लागणार आहे, असे अमरावतीचे तहसीलदार संतोष काकडे यांनी आदेशान्वये स्पष्ट केले आहे.