निर्देश : कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थी अन् शिक्षकांना सक्ती नाहीअमरावती : मागील वर्षाप्रमाणेच यंदा ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करण्यात येणार आहे. या शिक्षक दिनानिमित्त शिक्षक कल्याण निधी जास्तीत जास्त गोळा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पेट्यांमधून जमा करण्यात येणाऱ्या या निधीसाठी मात्र कोठल्याही परिस्थितीत शिक्षक व विद्यार्थी यांना सक्ती राहणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. ‘शिक्षक दिन’ कसा साजरा करावा व त्या दिवशी शिक्षक कल्याण निधी कश्याप्रकारे जमा करावा याबाबत जिल्हा परिषद, पंचायत समिती, गाव, नगर व पातळीवर समित्या स्थापन करून शिक्षक दिन उत्साहाने साजरा करण्याविषयी शिक्षण विभागाने निर्देश जारी केले आहे. त्यानुसार सर्व जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी गावोगावी प्रचार सभा घेण्यात येणार आहे. कागदी बिलांची छपाई व कागदी बिल्ल्यांची विक्री करून जास्तीत जास्त कल्याण निधी जमा करण्यात येणार आहे. राज्यात सर्वच ठिकाणी एकाच प्रकारचे कागदी बिल्ले छपाई केले जाणार आहे. बिल्ल्यांसाठी पांढरा कागद वापरावा व त्याची किंमत ५ रूपये असणार आहे. या कागदी बिल्ल्यांचा हिशेब ठेवण्यात येऊन वरिष्ठ लेखा परीक्षकांकडून तपासून घ्यावा, असे शासन निर्देश आहेत. (प्रतिनिधी)
शिक्षक कल्याण निधी गोळा करणार
By admin | Published: August 31, 2015 12:10 AM