शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

चिमुकल्या अर्जुनला साश्रू नयनांनी निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 10:57 PM

घरासमोरच्या पटांगणात टेलिफोनच्या खांबाच्या अवतीभवती बागडणारा अर्जुन आता यापुढे दिसणार नाही. कारण ज्याच्याबद्दल त्याला भीती दाखवली जायची, नेमके त्याच निर्जीव खांबात संचारलेल्या विद्युत प्रवाहाने त्याचा बळी घेतला. त्याला असे कसे घराबाहेर जाऊ दिले, असे म्हणत त्याच्या आईसह आप्तांची रडारडी सुरू होती. त्यांच्या आकांताने बुधवारी अंत्यसंस्कार पार पाडत असताना करजगाववासी हेलावले होते.

ठळक मुद्देगाव झाले शोकमग्न : काळजाचा तुकडा हरपल्याने मातेचे आक्रंदन

नीलेश भोकरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककरजगाव : घरासमोरच्या पटांगणात टेलिफोनच्या खांबाच्या अवतीभवती बागडणारा अर्जुन आता यापुढे दिसणार नाही. कारण ज्याच्याबद्दल त्याला भीती दाखवली जायची, नेमके त्याच निर्जीव खांबात संचारलेल्या विद्युत प्रवाहाने त्याचा बळी घेतला. त्याला असे कसे घराबाहेर जाऊ दिले, असे म्हणत त्याच्या आईसह आप्तांची रडारडी सुरू होती. त्यांच्या आकांताने बुधवारी अंत्यसंस्कार पार पाडत असताना करजगाववासी हेलावले होते.अुर्जन विशाल शिरभाते हा सहा वर्षीय चिमुकला मंगळवारी साडेपाचला घरी आला. आल्याबरोबर तो आईला बिलगला. आईने कोडकौतुक केल्यानंतर खेळण्यासाठी तो बाहेर पडला, तो न परतण्यासाठीच. घरापुढील टेलिफोनच्या खांबात संचारलेल्या विद्युत प्रवाहाला त्याचा स्पर्श झाला. या खांबाला हात न लावण्याची ताकिद त्याला आई-वडिलांनी अनेकदा दिली होती. मात्र, आज दिवसच काळाचा होता. ही बाब लक्षात आल्यानंतर त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, हा प्रयत्न निष्फळ ठरला.बुधवारी सकाळी अर्जुनचा मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. तडकाफडकी शवविच्छेदन झाल्यानंतर ११.३० वाजता अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली. एव्हाना ग्रामस्थांना माहिती होताच आबालवृद्ध अर्जुनच्या घरासमोर गोळा झाले. यावेळी त्याचे नातेवाईक आणि आई दीपाली यांचा आकांत हृदय पिळवटून टाकणारा ठरला. त्याला असे कसे घराबाहेर जाऊ दिले, असे ही माउली प्रत्येकाला विचारत होती. त्याच्या स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले.एकुलता लेक काळाच्या पडद्याआडआजी-आजोबा, आई-वडील, भाऊ बहीण असे सहा जणांचे शिरभाते कुटुंब. एकुलता एक मुलगा आणि त्यातही हुशार चणीचा असल्याने अर्जुनचे कोडकौतुकच व्हायचे. कुटुंबीयांमध्येही तो प्रिय होता.शाळेने जागविल्या आठवणीअर्जुन ज्या शाळेत शिकत होता, त्या संत गाडगेबाबा प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये त्याच्या आठवणी वर्गशिक्षिका मीनल कविटकर यांनी जागविल्या. गृहपाठ वेळच्या वेळी, अभ्यासात नियमित, हुशार आणि चांगली वर्तणूक असल्याने तो वर्गात प्रिय होता, असे त्या म्हणाल्या.महावितरणच्या चुकीचा फटकाटेलिफोन खांबावरून महावितरणची ओव्हरहेड केबल गेलेली होती. त्याच्या तुटलेल्या आवरणातून तारांचा संपर्क होऊन खांबात वीज प्रवाह येत असल्याच्या तक्रारी वारंवार ग्रामस्थ करीत होते. याच खांबाने अर्जुनचा घात केला. त्याची संतप्त प्रतिक्रिया गावातच असलेल्या विद्युत केंद्राच्या तोडफोडीच्या रूपाने पुढे आली.महावितरणकडून तक्रार नाहीअर्जुनच्या मृत्यूनंतर स्थानिक विद्युत केंद्राची तोडफोड करण्यात आली होती. याबाबत महावितरणने अद्याप शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली नसल्याची माहिती पुढे आली आहे. दुसरीकडे शिरभाते कुटुंबीयांनीही अद्याप महावितरणच्या सदोष कारभाराची तक्रार दिलेली नाही.