फोटो -
सरपंचाचा पुढाकार
मोर्शी : हिवरखेडचे सरपंच विजय पाचारे यांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा प्रशासनातर्फे ‘तहसील प्रशासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन २ जुलै रोजी गावात करण्यात आले. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या उपक्रमाला भेट दिली.
कोरोनाकाळात शासकीय कार्यालयांमध्ये पूर्ण क्षमतेने अधिकारी-कर्मचारी उपस्थित राहू शकले नाहीत. परिणामी कोरोनाच्या संकटामध्ये सर्वसामान्य माणसांचे तहसील कार्यालयातील कामे होऊ शकली नाही. त्यामुळे सरपंच विजय पाचारे यांनी पुढाकार घेऊन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तहसील कार्यालयात राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना व नागरिकांची प्रलंबित कामे या उपक्रमातून करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांच्या समस्या जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांचे प्रलंबित फेरफार, संजय गांधी, श्रावणबाळ योजना, अन्नपुरवठा विभागातील रेशन कार्ड व धान्य वितरणाबाबत कामकाज, नैसर्गिक आपत्ती विभागातील अनुदान वाटप, घरे पडझड, शेतकरी आत्महत्या, तलाठी व मंडळ अधिकारी स्तरावरील कामकाज, महसूल विषयक विविध योजनांची माहिती जनतेला देणे, विविध प्रकारचे दाखले तात्काळ तयार करून देणे, सेतुविषयक इतर कामकाज, महाराष्ट्र राजस्व अभियान अंतर्गत उपक्रम राबविणे, लसीकरण व कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत आरोग्य यंत्रणेचे सर्वेक्षण, रोजगार हमी योजनेची कामे, अतिक्रमण नियमानुकूल करणे तसेच विविध तक्रार अर्जांचा जागीच निपटारा करण्यात आला.
गावातील मोठ्या हॉलमध्ये आयोजन करण्यात आल्याने नागरिकांची गर्दी टाळता आली. शासन व प्रशासनाच्या सर्व नियम व अटींचे पालन करून प्रशासन आपल्या दारी कार्यक्रम शांततेत पार पडला. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, नायब तहसीलदार विठ्ठल वंजारी, तलाठी, ग्रामसेवक सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच विजय पाचारे, उपसरपंच मंगेश पवार, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील सुभाष नागले, कैलास बारस्कर, रोशन शेख, दीपक गायकवाड, विलासराव गणोरकर, वैभव दारोकर, राहुल बिजवे, विजय सुपले, सुशांत निमकर आदी उपस्थित होते.