अमरावती : शासकीय कर्मचाऱ्यांचे संप मागे घेत असल्याचे वृत्त असतांनाच तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेद्वारा ३ एप्रिलपासून बेमुदत कामबंद करण्याचे निवेदन सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला दिले आहे. राजपत्रित ग्रेड २ यांचे ग्रेड पे ४८०० रुपये करण्याची संघटनेची मागणी आहे व यासाठी कालबद्ध आंदोलन करण्यात येत आहे.
शासकीय व निमशासकीय कर्मचारी संघटनांच्या बेमुदत संपात २७ मार्चपासून सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये नायब तहसीलदार, तहसीलदार व उपजिल्हाधिकारी हे केवळ नैसर्गिक आपत्ती व कायदा, सुव्यवस्था संदर्भातील कामे पाडतील असे संघटनेनी स्पष्ट केले आहे. याशिवाय ३ एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुद्ध सुरु राहील, असे निवेदनात नमुद आहे. आरडीसी विवेक घोडके यांना निवेदन देताना संघटनेच्या जिल्हाध्यक्ष नीता लबडे, कार्यध्यक्ष वैभव फरतारे, उपजिल्हाधिकारी राम लंके, आशिष बिजवल, मनीष गायकवाड, यांच्यासह योगेश देशमुख, संतोष काकडे, वैशाली पाथरे, निकिता जावरकर, अशोक काळिवकर, अरविंद माळवे, प्रवीण देशमुख, यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार उपस्थित होते.