दाहकता कमी : उत्तर भारतातील पावसाचा परिणाम, नागरिकांना दिलासाअमरावती : उत्तर भारतात पावसामुळेमुळे विदर्भातील तापमानात कमालीची स्थिरता प्राप्त झाली आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ४५ डिग्रीवर गेलेले तापमान एप्रिल महिन्यात पुन्हा ४२ अंशावर आले आहे. २७ एप्रिलपर्यंत तापमानात विशेष बदल होणार नसून वावटळी सुटणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.उन्हाळा जीवाची लाही लाही करणाराच ठरते, यंदा तर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाने उच्चांक गाठल्यामुळे नागरिक हैराण झाले होते. त्यातच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला उन्हाची तीव्रता वाढली होती. आता दोन दिवसांपासून जिल्ह्यातील तापमान कमी झाल्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांच्या मते उत्तर भारतातील जम्मु-कश्मिर, बंगाल, नार्थ-ईस्ट, छत्तीसगढ अशा तिन्ही बाजूला पाऊस पडत असल्यामुळे त्या भागातून थोडेफार प्रमाणात थंड वारे विदर्भाच्या दिशेने येत आहे. त्यातच झारखंड ते तामीळनाडू व राजस्थान ते ओरीसा भागात कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे. अरबी समुद्रावर चक्राकार वारे असून समुद्रावरून थंड वारे सुध्दा विदर्भाकडे येत आहे. परिणामी विदर्भातील तापमान कमी झाले असून ही स्थिती २७ एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे.सद्यस्थितीत जिल्ह्यातील तापमान ४२ डिग्री सेल्सीअस आहे.दर्यापुरात वावटळउत्तर भारतात पाऊस, झारखंड ते तामीळनाडू तसेच राजस्थान ते ओरीसावर कमी दाबाची द्रोणीय स्थितीमुळे वावटली सुटणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञाचा आहे. त्या अंदाजानुसार जिल्ह्यात अनेक ठिकाणी वावटळी सुटल्या असून दर्यापुरात नुकतीच वावटळीची स्थिती निर्माण झाल्यामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले होते.
तापमान स्थिरावले, वावटळी सुटणार
By admin | Published: April 24, 2017 12:47 AM