अमरावती ; कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने लाॅकडाईनचा पर्याय निवडला आता अनलाॅकनंतर सर्व खुले केले असतानाही मंदिरे व शाळा बंदच असल्याने अद्यापही कोरोनाचे सावट असल्याचे चित्र दिसून येत आहे.सणासुदीचे दिवस असतांनाही मंदिरे बंद आहेत.परिणामी भाविकांचाही हिरमोड होत आहे.
मागील दिड वर्षपासून मंदिराचे दरवाजे बंद आहेत.तर शाळा उघडल्या असल्या तरी विद्यार्थ्याविना. ना विद्यार्थी शाळेत ना भक्त मंदिरात असे चित्र आजघडीला आहे.ग्रामीण भागातील आठवी ते बारावीपर्यतचे वर्ग सुरू केले आहेत. या ठिकाणीही मोजकेच विद्यार्थी उपस्थित राहत आहेत.परिणामी विद्यार्थीही शिक्षणापासू दूर जात असल्याचे दिसून येत आहे. आठवी ते बारावी वगळता इतर वर्ग बंद असल्याने बहूतांश विद्यार्थी अभ्याक्रमापासून विचलीत होत आहे. श्रावण महिना हा पुजाअर्चा करण्याचा महिना मानला जातो.त्यामुळे भाविष अशावेळी घरीच पुजाअर्चा करून समाधान मानावे लागत आहे. मंदिर म्हटले की रोज भाविकांची रेलचेल नेहमीच पाहावयास मिळायची मात्र कोरोना संकट आल्यापासून मंदिरेही बंद असल्याने हा परिसर सुनासन दिसत आहे.