शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

रेतीची अवैध वाहतूक करणारे दहा ट्रक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 11:57 PM

वर्धा नदीतून क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतूक करणारे दहा ट्रक महसूल विभागाने जप्त केले आहेत.

ठळक मुद्देतहसीलदारांची कारवाई : तीन लाखांचा दंड

आॅनलाईन लोकमतधामणगाव रेल्वे : वर्धा नदीतून क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतूक करणारे दहा ट्रक महसूल विभागाने जप्त केले आहेत. तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी ३ लाख १७ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.सोमवारी रात्री तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी अवैध रेती वाहतूकदारांवर करावाईचा बडगा उगारला. त्यांनी तळेगाव दशासर, अंजनसिंगी चौफुली, कुऱ्हा  मार्ग, मंगरूळ दस्तगी, देवगाव परिसरात कारवाई करीत तब्बत दहा ट्रक जप्त केले. या ट्रकमधून क्षमतेपेक्षा जास्त रेतीची वाहतूक केली जात होती. कारवाई करण्यासाठी तालुक्यात पाच भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. तहसीलदारांनी स्वत: या पथकांसोबत रात्री गस्त घातली. ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यानी सांगितले. यापूर्वीदेखील त्यांनी तालुक्यातील अवैध रेती वाहतूकदारांवर कठोर कारवाई केली होती. एक महिन्यापूर्वी कारवाई करून त्यांनी रेती माफियावर अंकुश लावला होता. आता पुन्हा या मोठ्या कारवाईमुळे रेती वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहे.पाच घाटांवर करडी नजरतालुक्यातील गोकुळसरा, आष्टा, नायगाव, चिंचोली, वकनाथ, विटाळा या रेतीघाटांवर महसूल विभागाने करडी नजर ठेवली आहे. लिलाव झाल्यानंतर अधिकृत परवानगी मिळण्यापूर्वी रेतीचे उत्खनन करण्यात आले आहे. तलाठ्यांनी घाटाकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना थेट निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याची माहिती तहसीलदार डोईफोडे यांनी दिली.