शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
2
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
4
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
5
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
6
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
7
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
8
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
9
स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली...
10
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
11
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
12
Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल
13
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
14
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
15
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
16
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
17
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
18
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 
19
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
20
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती

बडनेरा येथील रेल्वे वॅगन कारखान्याची निविदा मार्गी

By admin | Published: September 07, 2015 12:21 AM

बडनेरा येथील प्रस्तावित रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याची निविदा अखेर मार्गी लागली आहे.

१८७ कोटी रुपये ठरले मूल्य : १५ आॅक्टोबरपर्यंत अवधीअमरावती : बडनेरा येथील प्रस्तावित रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याची निविदा अखेर मार्गी लागली आहे. १४ आॅगस्ट रोजी निविदेने पहिला टप्पा गाठला असून १८७ कोटी रुपयांचे निविदा मूल्य ठरविण्यात आले आहे. १५ आॅक्टोबरपर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून या यंत्रणेला कार्यादेश दिले जाणार आहेत.रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार बडनेरा येथे साकारल्या जाणाऱ्या रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या निर्मितीची जबाबदारी पाटणा येथील रेल्वे बांधकाम विभागावर सोपविली आहे. ई-निविदा प्रक्रिया राबविण्यापासून ते कंत्राटदार नेमून हा प्रकल्प पूर्र्णत्वास नेण्यासह विविध बाबी पाटणा रेल्वे बांधकाम विभागाला पूर्ण कराव्या लागणार आहेत. तीन महिन्यांपासून याबाबत तयारी केली असताना १४ आॅगस्ट रोजी निविदा मार्गी लावल्यावर त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. जमीन अधिग्रहण प्रक्रिया पूर्णअमरावती : दरम्यान हा प्रकल्प साकारल्या जाणार अथवा नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. आता ई- निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामुळे बडनेऱ्यात प्रस्तावित रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या निर्मितीचे मार्ग सुकर झाले आहे. या कारखान्याच्या निर्मितीसाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्णत्वास गेली आहे. १५ कोटी रुपये जमीन अधिग्रहणाचे वाटप करण्यात आले आहे. या प्रकल्पाशेजारी प्रशस्त इमारत, २०० क्वॉटर्स तर कारखान्याचे शेड उभारले जाणार आहे. १९६ एकर जमिनीवर साकारणार प्रकल्पबडनेरा येथे पाचबंगला परिसरातील उत्तमसरा मार्गावर रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या२२ १९६ एकर जमिनीवर साकारला जाणार आहे. त्याकरिता ६४ शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. एकूण २०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून मौजा टाकळी, बडनेरा, दुर्गापूर येथील प्रकलपग्रस्तांच्या जमिनी ताब्यात घेतल्या आहेत. २३ घरे तर १०९ लोकसंख्या यामध्ये बाधित होणार आहे.