लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील १८ प्रभागांमध्ये स्वच्छता कंत्राटासाठी निविदा प्रक्रिया पार पडली. यामध्ये ‘लोवेस्ट वन’ऐवजी अन्य कंत्राटदारांच्या निविदा मंजूर करण्यात आल्या. या प्रक्रियेमध्ये कटी पद्धतीने घोळ झाला, याचा पाढाच उपस्थित नगरसेवकांनी पालकमंत्र्यासमक्ष शुक्रवारी वाचला. शहर स्वच्छतेबाबत कमालीचे आग्रही असलेल्या पालकमंत्र्यांनी तात्काळ निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजय निपाने यांना दिले.शहरातील विविध बाजार, गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी काटेकोर स्वच्छता असली पाहिजे. अस्वच्छतेबाबत नगरसेवकांच्या तक्रारी लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करून निविदा प्रक्रिया राबवावी व स्वच्छतेच्या कामांत सातत्य ठेवावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. नगरसेवकांसमवेत त्यांनी शुक्रवारी शहरातील स्वच्छता कामांची पाहणी केली. यावेळी आयुक्त संजय निपाणे, आरोग्य अधिकारी सीमा नैताम, अतिक्रमण निर्मूलन पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे, स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. पाहणी दौऱ्यात प्रारंभी शंकरनगर परिसर, फरशी स्टॉप परिसर, गौरक्षणच्या बाजूचा दस्तुरनगर परिसर, शिवधारा नेत्रालय, जयभारतनगर चपराशीपुरा परिसर, बेलपुरा, रेल्वेस्टेशन, जुना कॉटन मार्केट रोड व त्यानंतर भाजी बाजार व इतवारा बाजारात पालकमंत्री फिरले. यावेळी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.पालकमंत्र्याद्वारे स्वच्छता कामांचा आढावाभाजीबाजार, इतवारा बाजारातील भाजीविक्रेते व दुकानदारांना कायमस्वरूपी सिमेंट-काँक्रीटचे ओटे बांधून द्यावे. परिसरात सांडपाण्याची सुरळीत व्यवस्था होण्यासाठी नाल्यांचे बांधकाम करावे. सडक्या भाजीपाल्याची दुर्गंधी व मोकाट गुराढोरांचा वावर रोखण्यासाठी जागोजागी कंटेनर ठेवावे आणि त्याची नियमित सफाई करावी. नागरिकांना ये-जा सोयीची व्हावी, यासाठी भाजीपाला विक्रेता व दुकानदारांना साहित्य आपल्या जागेतच ठेवण्यास सूचित करावे. परिसरात स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवावी, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.
स्वच्छता कंत्राटाच्या निविदा प्रक्रियेत घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 10:03 PM
शहरातील १८ प्रभागांमध्ये स्वच्छता कंत्राटासाठी निविदा प्रक्रिया पार पडली. यामध्ये ‘लोवेस्ट वन’ऐवजी अन्य कंत्राटदारांच्या निविदा मंजूर करण्यात आल्या. या प्रक्रियेमध्ये कटी पद्धतीने घोळ झाला, याचा पाढाच उपस्थित नगरसेवकांनी पालकमंत्र्यासमक्ष शुक्रवारी वाचला. शहर स्वच्छतेबाबत कमालीचे आग्रही असलेल्या पालकमंत्र्यांनी तात्काळ निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजय निपाने यांना दिले.
ठळक मुद्देनगरसेवकांनी वाचला पाढा : पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश