शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

राजापेठ चौकात तणाव

By admin | Published: October 14, 2014 11:12 PM

स्थानिक राजापेठ चौकात बडनेरा मतदारसंघातील काँग्रेस, शिवसेना आणि युवा राष्ट्रवादी समर्थित उमेदवारांचे मुख्य प्रचार कार्यालये असून या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते सोमवारी रात्री आमने- सामने आलेत.

पोलीस आयुक्त पोहोचले : उमेदवारांची प्रचार कार्यालये केली बंदअमरावती : स्थानिक राजापेठ चौकात बडनेरा मतदारसंघातील काँग्रेस, शिवसेना आणि युवा राष्ट्रवादी समर्थित उमेदवारांचे मुख्य प्रचार कार्यालये असून या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते सोमवारी रात्री आमने- सामने आलेत. त्यामुळे काही काळ तणावदेखील निर्माण झाला. दरम्यान पोलीस आयुक्त घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आयुक्तांनी मुख्य प्रचार कार्यालये बंद पाडलीत. एवढेच नव्हे तर प्रचार कार्यालयांवरील उमेदवारांचे पोस्टर, होर्डिंग्ज, प्रचार साहित्य काढण्यास भाग पाडले.सोमवारी सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्या. त्यानंतर कार्यकर्ते, समर्थक उमेदवारांच्या प्रचार कार्यालयात एकत्रित झाले. कार्यकर्ते आणि समर्थकांची गर्दी वाढली. राजापेठ चौकात बडनेरा मतदारसंघातील काँग्रेस, युवा स्वाभिमान व भाजप, शिवसेना उमेदवारांचे मुख्य प्रचार कार्यालये आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच गर्दी केली होती. काही कार्यकर्ते रस्त्यावरच चर्चा करीत उभे होते. सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास कार्यकर्त्यांनी रस्त्यावर गर्दी केल्याने वाहतुकीत खोळंबा निर्माण होऊ लागला होता. राजापेठ चौकात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी कार्यकर्त्यांना रस्त्याच्या बाजूने उभे राहण्याचा सल्ला दिला. मात्र येथे गर्दी वाढतच होती. काँग्रेस आणि युवा स्वाभिमानच्या उमेदवारांचे मुख्य प्रचार कार्यालये समोरासमोर असल्यामुळे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. काही वेळाने तणावाचे वातावरण निर्माण झाले. ही बाब पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांना कळताच त्यांनी घटनास्थळी क्यूआरटी पथकासह दाखल झाले. सोमवारी सायंकाळी ५ वाजता प्रचारतोफा थंडावल्या तरी राजापेठ चौकातील उमेदवारांच्या मुख्य प्रचार कार्यालयावरील पोस्टर, बॅनर, होर्डिग्ज हटविण्यात आले नव्हते. परिणामी आयुक्त मेकला यांनी काँग्रेस, युवा स्वाभिमान, भाजप उमेदवारांच्या मुख्य प्रचार कार्यालयावरील मतदारांना आकर्षित करणारे साहित्य काढण्याच्या सूचना उमेदवारांच्या समर्थकांना केल्यात. यावेळी काही कार्यकर्त्यांनी होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर हटविण्यास नकार दिला. मात्र, पोलीस खाक्यापुढे कार्यकर्त्यांना नमते घ्यावे लागले. अखेर प्रचार कार्यालयावरील होर्डिंग्ज, पोस्टर, बॅनर काढण्यात आले. प्रचार कार्यालये बंद करुन कार्यकर्त्यांना निघून जाण्याच्या सूचना करण्यात आल्यात. राजापेठ चौकातील प्रचार कार्यालयात सुरु असलेली खानावळी, गर्दी शमविण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर पोलीस आयुक्तांचा ताफा बडनेरा मार्गावरील शिवसेनेच्या प्रचार कार्यालयात पोहचला. या कार्यालयात असलेली गर्दी हटविण्याचे पोलिसांनी सांगितले. त्वरित खानावळी बंद करण्यात आले. प्रचार कार्यालयावरील साहित्य हटविले गेले. काही कार्यकर्ते झिंगलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे या कार्यकर्त्यांना प्रचार कार्यालयाच्या आत पाठविण्यासाठी म्होरक्यांना कसरत करावी लागली. अखेर प्रचार कार्यालयावरील बॅनर, पोस्टर हटविण्यासाठी सहकार्य केले. पुढे पोलीस आयुक्तांचा ताफा गाडगेनगर येथील शिवसेनेचे उमेदवार प्रदीप बाजड यांच्या मुख्य प्रचार कार्यालयासमोर पोहचला. यावेळी प्रदीप बाजड, लक्ष्मी वर्मा यांचा पोलिसांशी वाददेखील झाल्याची माहिती आहे. कायदा, सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आले. (प्रतिनिधी)