अमरावती ; यंदा दहावीचे विद्यार्थी यापूर्वी शासकीय रेखा कला परीक्षेत एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड उत्तीर्ण झाले आहेत . त्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण आता मिळणार आहे.दहावीत विद्यार्थ्याच्या या गुणासाठी महाराष्ट्र राज्य कलाअध्यापक संघ महामंडळाने शासनाकडे सतत पाठपुरावा केला होता.याची दखल घेत शासनाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे दहावीतील विद्यार्थ्याना दिलासा मिळाला आहे.
दहावीत कला आणि क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवण्यासाठी त्यांच्या कामगिरी प्रमाणे विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण दिले जातात. ज्याचा उपयोग त्यांना आपल्या या क्षेत्रातील पूढील करीअरसाठी तर होतोच शिवाय दहावीचा निकाल देताना हे अतिरिक्त गुण मिळतात. यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे कला संचालनालयाकडून एलिमेंटरी व इंटरमिजिएट या कला परीक्षा आयोजित केल्याने त्यांचे गुण विद्यार्थ्यांना मिळणार नाहीत असे जाहीर करण्यात आले होते. मात्र शैक्षणिक वर्ष २०२० मध्ये कला संचालनालयाकडून परीक्षा आयोजित न झाल्याने त्यांना परीक्षेला बसता आले नाही. त्यांना एलिमेंटरी परीक्षेत मिळालेली श्रेणी ही इंटरमीजिएट ग्रेड परीक्षेकरता देण्यात यावी आणि त्याव्दारे दहावीला सवलतीचे गुण देण्यात यावे अशी महाराष्ट्र कलाअध्यापक संघ महामंडळाचे राज्याध्यक्ष पी.आर.पाटील,जिल्हाध्यक्ष विनोद लेव्हरकर,जिल्हा सचिव मोहन बैलके व पदाधिकारी यांनी शासनाकडे लेखी निवेदनाव्दारे केली होती.या पाठपुराव्याची शासनाने दखल घेऊन चित्रकलेचे अतिरिक्त कला गुण देण्याचा निर्णय घेतला आहे.
बॉक्स
विद्यार्थ्यांना दिलासा
अंतर्गत मूल्यमापनाच्या पद्धतीमध्ये या विद्यार्थ्यांना क्रीडाचे सवलतीचे गुण मिळणार होते . पण कला गुण मिळणार की नाही याबाबत संभ्रम होता. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने यासंदर्भात बुधवारी शासन निर्णय जारी करत यंदाच्या परीक्षेत दहावीच्या विद्यार्थ्यांना चित्रकलेचे अतिरिक्त कलागुण मिळणार असे जाहीर केले आहे.