अमरावती : नोकरीच्या घटलेल्या संधी, पहिल्या टीईटीचा घटलेला निकाल याचा परिणाम डिसेंबरमध्ये होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेवर होण्याची शक्यता आहे.परीक्षा अर्जाच्या प्रक्रियेकडे शिक्षणशास्त्र पदविकाधारकांनी (डीटीएड) पुरती पाठ फिरविली आहे.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया १ आॅक्टोबरपासून सुरू झाली. यात २२ आॅक्टोबरपर्यंतच विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. १४ डिसेंबर रोजी घेण्यात येणाऱ्यापरीक्षेसाठी मागील वर्षीच्या तुलनेत यंदा डीटीएडधारकांनी फार कमी प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे. राज्यात डीटीएड धारक बेरोजगारांची संख्या नऊ ते दहा लाखांच्या घरात आहे. पात्र उमेदवारांच्या तुलनेत नोकरीच्या संधी फारशा नाही. यातच दरवर्षी बेरोजगारांची संख्या वाढत आहे. अशातच मागील वर्षीपासून नेट सेटच्या धर्तीवर राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा सुरू झाली. परंतु पहिल्या परीक्षेतही अनेक मागे राहिल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सुर आहे. यामुळे त्याचा परिणाम डिसेंबर २०१४ मध्ये होणाऱ्या दुसऱ्या टीईटी परीक्षेवर होणार असल्याची शक्यता विद्यार्थ्यांनी वर्तविली आहे.पहिल्या टिईटीचा निकाल केवळ पाच टक्के लागला होता . परीक्षेतही काही त्रुटी हात्या काही प्रश्नांची उत्तरे चुकीची असल्याचा आक्षेप विद्यार्थ्यांनी घेतला होता. याचा परिणाम ही परीक्षेवर झाल्याचे बोलले जात आहे.पहिल्या टीईटीला प्राथमिक स्तरावरील पेपरसाठी अमरावतीसह राज्यातील ३ लाख ६७ हजार ८९६ डीटीएड धारक बसले होते. यापैकी ४. ४३ तर दुसऱ्या माध्यमिक स्तरावरील पेपरसाठी २ लाख २४ हजार ९४ विद्यार्थ्यांनी सभाग घेतला होता. यामधील ५. ९५ टक्केच विद्यार्थी पात्र ठरले. यामुळे दर्जाचाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
टीईटीकडे विद्यार्थ्यांनी फिरविली पाठ
By admin | Published: October 15, 2014 11:13 PM