विरोधकांचा सफाया : शेतकरी सहकारी पॅनेलचा एकहाती विजयतिवसा : तालुक्याच्या सहकारक्षेत्रात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख खरेदी -विक्री संघाच्या निवडणुकीत आ. यशोमती ठाकूर यांच्या शेतकरी सहकार पॅनेलचे सर्व तेराही संचालक विजयी झालेत. रविवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी पार पडली. दोन उमेदवार यापूर्वीच अविरोध निवडून आले आहेत. तेदेखील याच पॅनेलचे आहेत. खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत आ.ठाकूर गटाचे शेतकरी सहकार पॅनेल व भाजप - सेनेच्या शेतकरी सहकार पॅनेलचे २३ उमेदवार रिंगणात होते. वैयक्तिक भागधारक मतदारसंघातील १००८ मतदारांपैकी ६७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. संलग्न सहकारी संस्था मतदारसंघातील ५८ मतदारांपैकी ५७ मतदारांनी मतदान केले. येथील अप्पर वर्धा मनोरंजन सभागृहात सोमवारी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू झाली. येथील सहायक निबंधक कार्यालयाचे यू.व्ही.जिकाटे व व्ही.बी. लेंडे यांच्या मार्गदर्शनात १० कर्मचाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. ठाकूर गटाचे विजयी उमेदवार वैयक्तिक भागधारक मतदारसंघात गजानन अळसपुरे, राजेश चौधरी, राजेश राऊत, आशिष बायस्कर, कैलास कठाळे, संलग्न सहकारी संस्था मतदारसंघात शरद देशमुख, सुरेश धवणे, अविनाश काळे, रवींद्र हांडे, नंदकिशोर गोहत्रे, महिला राखीव मतदारसंघात चित्रलेखा खारकर, विजया विलास माहुरे व अनु. जाती मतदारसंघात दिलीप वानखडे भरघोस मतांनी विजयी झाले. दोन संचालक अविरोधतिवसा : दुपारी १ वाजता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. यामध्ये विरोधकांचा सफाया करीत आ. यशोमती ठाकूर गटाचे सर्व उमेदवार विजयी झालेत. या निवडणुकीत ६५ मते अवैध ठरली. यात वैयक्तिक भागधारक मतदारसंघात १९, संलग्न सहकारी मतदारसंघात ५, महिला राखीव मतदारसंघात १५ व अनुजाती मतदार संघात २६ मते अवैध ठरली. निवडणुकीत इतर मागासवर्गीय मतदारसंघात मिलिंद काळमेघ व अनुसूचित जमाती मतदारसंघात शाम बोकडे हे ठाकूर गटाचे उमेदवार यापूर्वीच विजयी झाले आहेत. निवडणूक निकाल जाहीर होताच सुरेश साबळे, मुकूंद देशमुख, दिलीप काळबांडे, संजय देशमुख, प्रफुल्ल देशमुख, वैभव वानखडे, कमलाकर वाघ, शेषराव राठोड, भारत ढोणे, नरेंद्र विघ्ने, मधुकर भगत, रामदास मेहेधे, सचिन गोरे, गोकुल खाकसे, अतुल आंबुलकर, गंगाधर अरसोड, विनायक पाटील, दिवाकर देशमुख, किशोर चौधरी, बाळासाहेब घुरडे, अजय शिरभाते, नाना माहोरे, रोशन वानखडे, उमेश राऊत, अंकुश बनसोड, आशिष खाकसे, प्रशिक शापामोहन, देवीदास गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. (प्रतिनिधी)एकहाती सत्ता देऊन तिवस्यातील जनतेने माझ्यावर विश्वास टाकला आहे. हा विजय एकाट्याचा नसून तो सर्वांचा विजय आहे. भविष्यात हा विश्वास सार्थकी लावेल. - यशोमती ठाकूर, आमदार तिवसा
तिवसा खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत ठाकूर गट विजयी
By admin | Published: April 12, 2016 12:04 AM