पुसला (वार्ताहर ) - परीसरात साथीच्या आजाराने थैमान घातले असून सर्दी, ताप, खोकला ने अनेक रुग्णात वाढ झाली आहे. याला गावातील उकीरडे व घाणीचे साम्राज्य व त्यामुळे वाढलेले डासाचे प्रमाण कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे वाढत्या डासावर नियंत्रन आणण्याकरीता धूरफवारणीला ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सुरवात करण्यात आली आहे. पुसला हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून या गावात गेल्या अनेक दिवसापासून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गावातील पुनवर्सन व मध्य भागात सांडपाण्यााने नाल्या तुडूब भरल्या असून पाणी रस्त्यावर वाहत आहे . गावात व मध्यभागी घाणीचे ढिगारे परसल्याने परीसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.यामुळे डेंगू , ताप , खोकला व साथीचे आजाराचे थैमान घातले असून रुग्णालये हाउसफुल झाली आहे . गावातील मुख्य रस्त्यावर, मध्यभागात,व शाळेतील परीसरात जागोजागी उकीरड्याचे ढिगारे वाढले आहे.त्यामुळे साथीचे आजार वाढण्याची शक्यता आहे. डासावर नियंत्रन आणण्याकरीता डासप्रतिबंधकारक फवारणीला सुरवात करण्यात आली आहे.
☰
Template
Image Attachment
Photo Manager
Social Media
Metadata
Attach Document
Translate
Backup
Agency
QrCode
Attch Audio/Video
Words : 1
Characters : 0