लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एक महिला घाबरलेल्या व भयभीत अवस्थेत ठाणेदारांपुढे येते आणि पतीने मारहाण करून घरातून हाकलून लावल्याचे सांगते. दीड महिन्यांचा चिमुकला घरी आहे, पती त्याचेही बरेवाईट करेल, असे सांगते. ठाणेदार आसाराम चोरमले यांनी त्वरेने हाती वायरलेस वॉकीटॉकी घेऊन त्या महिलेच्या पतीला ताब्यात घेण्याचे फर्मान पोलिसांना सोडले.नागरिकांच्या सरंक्षणाची जबाबदारी पोलिसांच्या कर्तव्याचाच असून तक्रारीवर तत्काळ अॅक्शन घेणे, हा सुध्दा कर्तव्याचाच भाग आहे. मात्र, काही पोलीस यंत्रणा तक्रारीची दखल तत्काळ घेणेच विसरले आहेत. मात्र, ठाणेदार चोरमलेंची कर्तव्य बजावण्याची पद्धत वेगळी आहे. शनिवारी दुपारी २ वाजता एक तरुणी ठाणेदाराकडे येते आणि एका एसआरपीएफ जवानाने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचे कथन करते. आता तो दुसऱ्या तरुणीशी सांक्षगंध करीत असल्याची तक्रार ती तरुणी करते. हा प्रकार ऐकताच ठाणेदार चोरमले यांनी एका पोलिसाला त्या जवानाच्या शोधात पाठविले. काही वेळातच तो कर्मचारी त्या जवानाला ठाण्यात हजर करतो. हे प्रकरण निपटत नाही, तर भयभीत अवस्थेत एक महिला ठाण्यात येते. पती दारू पिऊन मारहाण करीत आहे, त्याने घरातून हाकलून लावले, माझा दीड महिन्याचा बाळ पाळण्यातच आहे. पती त्याचेही बरेवाईट करेल, अशी ती सांगते. त्यावर तत्काळ अॅक्शन घेत चोरमले गस्तीवरील पोलिसांना सुचना देऊन त्या महिलेच्या पतीस ठाण्यात आणण्यास सांगतात. काही वेळातच पोलीस तिच्या पतीला घेऊन ठाण्यात आणतात. त्यानंतर पुढील कारवाई सुरू केली जाते. अशा प्रकारची तडकाफडकीची कारवाई करण्याचे कर्तव्यदक्ष ठाणेदार चोरमले असल्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळत आहे.
ठाणेदार चोरमलेंची 'आॅन द स्पॉट अॅक्शन'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 10:10 PM
एक महिला घाबरलेल्या व भयभीत अवस्थेत ठाणेदारांपुढे येते आणि पतीने मारहाण करून घरातून हाकलून लावल्याचे सांगते. दीड महिन्यांचा चिमुकला घरी आहे, पती त्याचेही बरेवाईट करेल, असे सांगते. ठाणेदार आसाराम चोरमले यांनी त्वरेने हाती वायरलेस वॉकीटॉकी घेऊन त्या महिलेच्या पतीला ताब्यात घेण्याचे फर्मान पोलिसांना सोडले.
ठळक मुद्देतक्रारींची दखल : प्रकरणांचा तातडीने निपटारा